🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या हेडलाईन्स......!


🌟शरद पवार अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करण्यास तयार ; कार्यकत्यांना मागितला 2-3 दिवसांचा वेळ🌟

✍️ मोहन चौकेकर                                                                

* शरद पवारांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा 

* शरद पवार अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करण्यास तयार ; कार्यकत्यांना मागितला 2-3 दिवसांचा वेळ - अजित पवार यांनी दिली माहिती 

* लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम स्थानी, एकूण 1 लाख 21 हजार 177 प्रकरणे निघाली निकाली

* सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीच्या साखर कारखान्यातील कामगारांचा मायदेशी परतीचा प्रवास सुरू, भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू 

* सहा महिन्याच्या लहान मुलाचे अपहरण करून नक्षली भागात दोन लाखात विक्री; भिवंडी पोलिसांकडून तिघांना अटक 

* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेले गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या शेवटच्या गावांमध्ये, बॉर्डरवर केला जवानांशी संवाद, जवानांच वाढवले मनोबल

* भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'टीडीएम' चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करून द्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचे आवाहन

* भारतीय क्रिकेट संघ आता कसोटी रँकिंगमध्येही पोहोचला अव्वलस्थानी, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची माहीती

* शरद पवार यांनी आज राजकारणातून निवृत्ती घेण्याची केली घोषणा, राष्ट्रवादीच्या नेत्यांना बसला धक्का ; जयंत पाटील व जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर

* व्हॉट्सअ‍ॅपने 5 महिन्यांत जवळपास 2 कोटी खाती केली बंद, मार्च महिन्यात भारतात 47 लाख 15 हजार 906 खाती बंद  

* येत्या नोव्हेंबरमध्ये उघडणार भारतातील पहिला पाण्याखालील समुद्र बोगदा ; गिरगाव ते वरळी अंतर अवघ्या 10 मिनिटांत

* कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याचा धक्का, हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिग

* इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी:छत्रपती संभाजीनगर येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करावे - इम्तियाज जलील यांची ज्योतिरादित्य सिंधियांकडे मागणी

* अजिंक्यपद : सांघिक टेबल टेनिस चॅम्पियनशिप संघात कनिष्ठ गटात श्लोक, वरिष्ठ गटात मनोज संघाने पटकावले विजेतेपद

* ताजिकिस्तानला 5.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

* भारत डिसेंबर 2023 पर्यंत जम्मू कश्मीर मध्ये सापडलेल्या लिथियमचा लिलाव करणार

* राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या: पी शिवशंकर हे शिर्डी संस्थानचे नवे सीईओ, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी जी श्रीकांत यांची नियुक्ती, तर तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशूसंवर्धन खात्यात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती

* दुःखद निधन : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन,89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली माहीती

* सेन्सेक्स 242 अंकांनी वाढुन 61354.71 अंकाच्या पातळीवर तर निफ्टी 82 अंकांनी वाढुन 118,147.65 अंकावर बंद

* तब्बल 204 कोटींचा हार : प्रियांका चोप्राने घातला लग्झरी ब्रँड बुल्गरीचा 11.16 कॅरेटचा लगूना ब्लू डायमंडने बनलेला 204 कोटींचा हार, 'मेट गाला' या फॅशन इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावर केले शेअर

* गोल्डी ब्रार कॅनडात मोस्ट वॉन्टेड घोषित,* लॉरेन्सचा विश्वासू टॉप-25 गुन्हेगारांच्या यादीत; सिद्धू मुसेवालाची केली होती हत्या

* सोन्याचे आजचे दर : मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60760 रुपये 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या