🌟मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेसने डब्याच्या दरवाजात बसून प्रवास करणारा २१ वर्षीय युवक गंभीर जखमी....!


🌟प्लॅटफॉर्मला पाय घासल्यामुळे झाली गंभीर दुःखापत🌟

छ.संभाजी नगर (दि.०८ मे २०२३) - मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसच्या दरवाज्यात बसून प्रवास करत असताना छ.संभाजी नगर जिल्ह्यातील पोटुळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मला पाय घासल्यामुळे विशालसिंग महासिंग नागलोत वय २१ वर्ष या युवकाच्या पायास गंभीर दुःखापत झाल्याची घटना आज सोमवार दि.०८ मे २०२३ रोजी घडली आहे.


या घटने नंतर त्याला त्याच्या मित्रांनी घटने संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा बल छ.संभाजी नगर यांना माहिती न देता सिडको टिव्ही सेंटर संभाजी नगर जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या