🌟पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा सुधारित परभणी जिल्हा दौरा.....!


🌟पालकमंत्री डॉ.सावंत उद्या शुक्रवार दि.२६ मे रोजी येणार परभणीत🌟

परभणी (दि.२५ मे २०२३) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे उद्या शुक्रवार दि.२६ मे २०२३ रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दिवसभराचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल. 

पालकमंत्री डॉ. सावंत यांचे हेलिकॉप्टरने सकाळी ९.५० वाजता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथे आगमन होईल त्यानंतर सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र त्रिधारा येथील मंदिरास व  10.15 वाजता जिजाऊ मंदिरास भेट देतील डॉ.तानाजी सावंत हे सकाळी १०:२५ वाजता परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजता परभणी जिल्हा नागरिक व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहतील. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होणा-या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहून, दुपारी १२:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आगमन व पाहणी करतील. त्यानंतर १०० खाटांच्या स्त्री रुग्णालय व डीईआयसी इमारतीचे दुपारी १२:४० वाजता लोकार्पण करतील. दुपारी १२:५० वाजता मॉड्युलर आयसीयु कॉम्प्लेक्सची पाहणी आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. 

पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे दुपारी २:३० वाजता पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहून नंतर 3.30 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण करतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या