🌟परभणी-गंगाखेड मार्गावरील दैठण्याजवळ कारच्या धडकेत दोघा मोटारसायकलस्वारांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू....!


🌟या घटनेत अन्य एक युवक गंभीर जखमी🌟

परभणी (दि.०९ मे २०२३) : परभणी ते गंगाखेड या महामार्गावर दैठण्याजवळ आज मंगळवार दि.०९ मे २०२३ रोजी दुपारी १२-३० च्या सुमारास भरधाव वेगाने धावणार्‍या एका कारने दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलवरील प्रवास करणाऱ्या दोन युवकांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

 दैठणा येथील दिपक कच्छवे (वय २४),विवेक नाईक (वय २५), पवन कच्छवे व अन्य एक असे चौघे एम.एच.२२ ए.वाय ३६९१ व एम.एच.२६ डी.६८०२ या दोन मोटारसायकलवर लग्नाच्या निमित्ताने निघाले होते. त्यावेळी एम.एच. १४ सी.एक्स. ८३४० या क्रमांकाच्या भरधाव कारने या दोन्ही मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही मोटारसायकलवरील चौघे रस्त्यावर कोसळले. त्यात दिपक कच्छवे व विवेक नाईक या दोघांचा मृत्यू झाला. तर पवन कच्छवे अन्य एकजण जखमी झाले. गंभीर जखमी पैकी एकास परभणीहून औरंगाबादकडे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या दोन मोटारसायकलला धडक दिल्यानंतर भरधाव कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जावून कोसळली.

          दैठणा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बळीराम मुंडे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या