🌟परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस स्थानकात मंगळवार दि.३० मे रोजी ९.५ ब्रास अवैध रेतीचा लिलाव...!


🌟उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟

परभणी (दि.२२ मे २०२३) : नवा मोंढा पोलिस स्टेशनमध्ये जप्त केलेल्या रेतीची शासकीय किंमत ५,७०० रुपये असून, या ९.५ ब्रास अवैध साठ्याचा जाहीर लिलाव मंगळवार, दि. ३० मे रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

या अवैध रेतीसाठ्याच्या लिलावात सहभागी होऊ इच्छिणारांनी अटी व शर्तीस अधीन राहून बोली बोलावी.  लिलावधारकाकडून सरकारी किमतीच्या एक चतुर्थांश रक्कम लिलावापूर्वी घेण्यात येईल. सहभागी व्यक्तीकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, टॅनकार्ड असणे आवश्यक आहे. लिलावधारकाने अंतिम केलेली संपूर्ण रक्कम लिलावाच्या दिवशी भरावी लागेल. शासन आदेशानुसार जीएसटी दर निश्चित झाल्यानंतर संबंधित कराचा भरणा करणे  बंधनकारक राहील. लिलावधारकाने जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांनी विहित करून दिलेल्या कालावधीतच रेतीसाठी उचलणे बंधनकारक राहील. जिल्हा खनिकर्म अधिका-याकडून मिळालेल्या पासेस रक्कम भरणा केल्यानंतर देण्यात येतील व त्या त्याच दिवशी हस्तगत करणे बंधनकारक राहील.

लिलावाची रक्कम विहित कालावधीत भरणा न केल्यास ती अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. लिलावधारकाने विहीत कालावधीत रेतीसाठ्याची उचल न केल्यास तो जप्त करुन फेरलिलाव घेण्यात येईल. वाळूसाठा आहे त्या स्थितीतच घ्यावा लागेल. वाळू लिलाव अंतिम झाल्यानंतर लिलावधारकाने गौण खनिज विकास प्रतिष्ठाणची १० टक्के रक्कम जमा करावी लागेल. साठवणूक केलेल्या रेती साठ्याच्या जागेचा अकृषीक कर भरणा करणे आवश्यक राहील. लिलावात भाग घ्यावयाचा आहे त्याने रेती साठा दर्शविलेल्या पत्त्यावर पाहून घ्यावा. त्याची जबाबदारी लिलावात बोली बोलणा-याची राहील. लिलाव अंशतः रद्द करणे किंवा पूर्ण रद्द करणे, काही कारणास्तव त्यात बदल करणे इ. अधिकार उपविभागीय अधिकारी परभणी यांनी राखून ठेवले असल्याचे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या