🌟महामानव तथागत भगवान बुद्धांची मूर्ती देऊन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांचा सन्मान.....!


🌟स्टेट बँक ऑफ इंडिया पुर्णा शाखेचे मुख्य व्यवस्थापक गोपाळ काटोले यांनी सन्मान केला🌟

पुर्णा (दि.११ मे २०२३) - भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांना महामानव तथागत भगवान बुद्धांची मूर्ती देऊन स्टेट बँक ऑफ इंडिया पुर्णा शाखेचे मुख्य व्यवस्थापक गोपाळ काटोले यांनी सन्मान केला.

थोर महापुरुष समाज सुधारक आणि मानवतावादी संताचे विचार आचरणात आणून सेवाभावी वृत्तीने आदरणीय काटोले साहेब काम करत असतात.कर्तव्यदक्ष सामाजिक बांधिलकी जपणारे संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता त्यांच्या मुखोद्गगत आहे.ग्रामगीता हा ग्रंथ त्यांनी मोठ्या संख्येने आपल्या मित्र परिवारांना सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रामधील सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या मान्यवरांना भेट दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या