🌟बाळूमामा पालखी सोहळ्याच्या ठिकाणी आयोजित किर्तन सोहळ्यात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं🌟
पुर्णा (दि.१५ मे २०२३) - कुटुंबातील नातेवाईक लोक ज्याला टाकून देतात त्याला बाळूमामा सारखे संत स्वीकारतात यावरून त्यांची महानता सिद्ध होते असे मत रामायनाचार्य ह.भ.प.रोहिदास महाराज मस्के यांनी काल रविवार दि.१४ मे २०२३ रोजी पुर्णा तालुक्यातील वझुर येथे रात्रीच्या सुमारास बाळूमामा पालखी सोहळ्याच्या ठिकाणी आयोजित किर्तन सोहळ्यात बोलताना व्यक्त केलं.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, व्यापारी मोहन काबलिया, भास्कर तिडके, बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मस्के महाराज म्हणाले महाराष्ट्रातील संतांनी आपल्याला एकमेकावर प्रेम करण्याची शिकवण दिली. माणसाबरोबरच पशुवर सुद्धा प्रेम करण्याचा संदेश संतांनी दिलेला आहे. आजपर्यंतच्या विविध ग्रंथात शेळी व मेंढीचा कुठेच उल्लेख नव्हता. पण या प्राण्यांना सुद्धा बाळूमामानी विशेष मानाचे स्थान मिळवून दिल. वेळात वेळ काढून जे लोक बाळूमामाची सेवा करतील त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर नऊ वाजता आरती संपन्न झाली. पंगतीचे नियोजन करणाऱ्या मानकर्या सोबतच पालखीचे प्रमुख कारभारी पाटील यांनी रोहिदास महाराज मस्के व सखाराम बोबडे पडेगावकर यांना आरतीचा मान दिला. परिसरातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते. सर्वांनी यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी वझुर येथे पालखीचा दुसरा दिवस होता. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वजूर व परिसरातील भाविक भक्तांनी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या