🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिले उन्हाळी सुट्टीत जिवनशिक्षणाचे धडे....!


🌟साहित्य व सुविधा शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष विद्यमान सदस्य नामदेवराव बोकारे यांनी उपलब्ध करुन दिले🌟


पुर्णा (दि.२२ मे २०२३) - पुर्णा तालुक्यांतील फुकटगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक आबनराव पारवे सर यांनी उन्हाळी सुट्टीत शालेय शिक्षणाबरोबरच पोहणे हे जिवन शिक्षण शाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांना दिले आहे.या साठी लागणारे सर्व साहित्य व सुविधा शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष व विद्यमान सदस्य नामदेवराव बोकारे यांनी उपलब्ध करुन दिले.

विद्यार्थ्यांची आबनराव पारवे सरांनी पोहण्याविषयीची भीती त्यांच्या मनातून काढून टाकली.त्यांना कसे पोहले पाहिजे याचे प्रात्यक्षिकासहीत मार्गदर्शन केले.विद्यार्थी न घाबरता सहज आनंदाने पोहणे शिकत आहेत.सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या