🌟पुर्णा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी दि.११ मे रोजी धरणे आंदोलन...!


🌟पुर्णा तहसिल कार्यालया समोर लोकशाही मार्गाने करण्यात येणार धरने आंदोलन🌟 

पुर्णा (दि.०९ मे २०२३) - तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी दि.११ मे २०२३ रोजी सकाळी १० ते ०१ वाजेपर्यंत पूर्णा तहसील कार्यालय समोर महात्मा गांधी मार्गाने शांततेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी आज मंगळवार दि. ०९ मे रोजी वाईस ऑफ मीडिया पूर्णा या संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 


देश पातळीवर पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कार्य करणाऱ्या व्हॉइस ऑफ मिडिया या संघटनेच्या वतीने राज्यभर एकाच दिवसी पत्रकारांच्या विविध मागण्याकरिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तर त्याच दिवशी पूर्णा व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने  सुद्धा पूर्णा तहसील कार्यालय समोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे हे धरणे आंदोलन गुरुवार दि.११ मे २०२३ रोजी सकाळी १० ते ०१ वाजेपर्यंत करण्यात  येणार आहे हे आंदोलन महात्मा गांधी मार्गाने शांततेत करण्यात येणार असून या आंदोलनाद्वारे पत्रकारांच्या  मागण्या सरकार पुढे मांडण्यात येणार आहेत ,पत्रकारांसाठी स्वातंत्र्य कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा., कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुट्ंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतव्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्यासाठी व धरणे आंदोलनाकरिता पूर्णा व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने पूर्णा तहसीलदार बोथीकर यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अनंद ढोणे, तालुका सरचिटणीस सुशील गायकवाड, तालुका कार्यवाहक संजय पांचाळ आदींच्या साक्षरऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या