🌟पुर्णा नगर परिषदेतील विचित्र 'प्रभारीराज' निकृष्ट बोगसकामे करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांनी सोडली अक्षरशः लाज ?


🌟शहरातील प्रत्येक प्रभागात निकृष्ट सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांसह विविध बोगस काम करीत प्रत्येकाला धनदांडग होण्याची खाज🌟


✍🏻विशेष वृत्त : चौधरी दिनेश

पुर्णा नगर परिषदेतील प्रशासक प्रभारी मुख्याधिकारी संतोष लोमटे प्रभारी नियमबाह्य नगर अभियंता तथा संगणक अभियंता सिध्दार्थ गायकवाड प्रभारी,लेखापाल प्रकाश कुंभार प्रभारी अन् या 'प्रभारीराज' वर पडद्या मागील भ्रष्ट जनमतधारी पुढारी आणि भ्रष्ट गुत्तेदार भारी अशी अवस्था झाल्यामुळे नगर परिषद कार्यालयातील 'प्रभारीराज' भ्रष्टाचाऱ्यांनी अक्षरशः सोडली लाज ? निकृष्ट विकासकामे करीत प्रत्येकालाच धनदांडग होण्याची भलतीच खाज...असा सुनियोजित कारभार पाहावयास मिळत असून 'चोर चोर मावस भाऊ शासकीय विकासनिधी हिळून मिळून खाऊ ? शहरातील सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांची वाट लावू अन् वरीष्टांच्या आदेशाला सगळे मिळून चुना लावू' अशी अवस्था पुर्णा नगर परिषद प्रशासनाची झाल्यामुळे काही ठिकाणी विकास कामांच्या आधीच बिल अन् काही ठिकाणी बिलांच्या आधीच निकृष्ट विकासकाम होत असल्यामुळे शहरात जणूकाही निकृष्ट व बोगस विकासकामांची सुनामीच आल्याचे दिसत आहे.


पुर्णा नगर परिषदेचा एकंदर कारभार 'प्रशासकीय आंधळ दळत अन् भ्रष्टाचारी काळकुट्ट कुत्र यथेच्छ पिठ खात' असा झाल्याने शहरातील नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून तक्रारदारांच्या तक्रारीला देखील कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेले भ्रष्ट कारभाराचे पाठीराखे केराची टोपली दाखवून ना...चौकशी,ना कारवाई....भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत तोंड मारणारे जणूकाही सर्वच भाई भाई ? भ्रष्टाचारी बकासूर गुत्तेदारांना मात्र शासकीय विकासनिधी गिळण्याची लगीन घाई या पध्दतीचा कारभार शहरातील प्रभाग क्रमांक ०१ या निर्मनुष्य शेतवस्तील विशेष रस्ते अनुदान योजनेच्या ६५ लाख रुपयांच्या निधीतून अवघ्या पंधरा दिवसापूर्वी केल्यास सिमेंट रोड अक्षरशः दुभंगला अर्थात भुकंप सदृष्य तडा गेल्याने दर्जाहीन निकृष्ट दर्जाच्या कामाचे पित्तळ उघडे पडल्याचे दिसत आहे तर याच रस्त्याच्या लगत सहा महिन्यांपुर्वी तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या विशेष रस्ते अनुदानाच्या ३३ लाख रुपयांच्या विकासनिधीतून बांधण्यात आलेल्या सिमेंटरोडला देखील भुकंपसदृष्य मोठमोठे तडे केल्यामुळे याही निकृष्ट व बोगस कामाचे पित्तळ उघडे पडले आहे तर प्रभाग क्रमांक ०२ मधील इंदिरा गांधी शाळा ते जोशी यांच्या घरापर्यंत विशेष रस्ते अनुदान योजनेतील अर्धाकोटी अर्थात ५० लक्ष रुपयांच्या विकासनिधीतून अत्यंत निकृष्ट व बोगस सिमेंट रस्ता पुर्वीच्या जुन्या रस्त्यावर बोगस सिमेंट/निकृष्ट खडी/माती मिश्रीत रेतीचा थातूर मातूर लेप लावून नव्याने सिमेंट रोड बांधल्याचे नाट्य रंगवण्यात आले तर याच परिसरातील आकाश किराना ते प्रमोद पल्ले यांच्या घरापर्यंत विशेष रस्ता अनुदान २०२२/२४ च्या अर्धाकोटी ५० लक्ष रुपयांच्या विकासनिधीतून अत्यंत निकृष्ट दर्जाचा बोगस सिमेंट/निकृष्ट खडी/माती मिश्रीत रेतीचा वापर करीत सिमेट रोडसह लोखंडी गजाळीचा यत्किंचितही वापर न करता सिमेंट नाली बांधकाम करण्याचे सोग रचल्याचे निदर्शनास येत असून याच प्रमाणे प्रभाग क्रमांक ०१ मधील शफीक बागवान यांच्या घरापासून ते शोयब बागवान यांच्या घरापर्यंत ते कल्लू गुत्तेदार यांच्या घरापर्यंत विशेष रस्ता अनुदान योजनेतील तब्बल अर्धा कोटी अर्थात ५० लक्ष रुपयांच्या विकासनिधीतून अत्यंत निकृष्ट सिमेंट रोड/सिमेट नाली बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे तर प्रभाग क्रमांक ०७ मधील विजयनगर लगतच्या रेल्वे भुयारी मार्गापासून अवेस कॉलनी पर्यंत तब्बल दिड कोटी अर्थात १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विशेष रस्ते अनुदानातील विकासनिधीतून बांधण्यात आलेल्या निकृष्ट व बोगस सिमेट रस्त्याचा अक्षरशः धुर्डा उडालेला असून या रस्त्याच्या कामात बोगस हलक्या दर्जाचे सिमेंट व खडी मशीन वरील डस्ट अर्थात फुफूर्डा वापरल्याने रस्ता पुर्ण होण्या अगोदरच या रस्त्याची अवस्था पुढे पाठ अन् मागे सपाट अशी झाल्याचे दिसत आहे तर याच परिसराच्या लगत असलेल्या हरिनगर येथील राजू बोधक यांच्या घरापासून ते रवी गायकवाड यांच्या घरापर्यत महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या तब्बल अर्धा कोटी अर्थात ५० लक्ष रुपयांच्या विकास निधीतून सिमें रोड/सिमेंट नालीचे अत्यत दर्जाहीन निकृष्ट बोगस काम करण्यात आले असून हे काम पुर्ण होण्यापुर्वीच खिरापती प्रमाणे नगर परिषद प्रशासनाने बिल ही संबंधित भ्रष्ट गुत्तेदाराला अदा केल्याचे समजते तर याच परिसरातील सुभेदार रामजी आंबेडकर सांस्कृतिक सभागृह जे दहा वर्षापुर्वी केवळ २५ लाख रुपयांतून उभारण्यात आले त्या सभागृहावर दोन वर्षाच्या काळात दुरूस्तीसह सुशोभिकरणाच्या नावावर थातूरमातूर कामे करून तब्बल १ कोटी रुपये गिळकृत करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून भ्रष्टाचाराचा कळस गाठत याच परिसरातील पंचशील नगर येथील भराडे यांच्या घरापासून ते बळीराम हणवते यांच्या घरापर्यंत तब्बल ६० लाख रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून अत्यंत निकृष्ट व बोगस सिमेंट रोड व सिमेंट नाली बांधकाम करीत भ्रष्ट नगर प्रशासनासह भ्रष्ट गुत्तेदाराने निर्लज्जपणाचे कळस गाठल्याचे पाहावयास मिळत असून याच परिसरातील आरआरसी ग्राऊंड लगतच्या कावशी मंदिर परिसरात रेल्वे कर्मचारी साळवे यांच्या घरापुढे ५० लक्ष रुपयांच्या शासकीय विकास निधीतून निकृष्ट व दर्जाहीन सिमेट रोड करण्यात आला आहे शहरात सर्वत्र निकृष्ट व बोगस सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांसह बोगस विकासकामांची मालिका चालवून नगर परिषद प्रशासन/भ्रष्ट आजी/माजी पडद्यामागील संधीसाधू भ्रष्ट गुत्तेदार यांनी शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा जणूकाही सुरळीतपणे अंत्यविधीचा पार पाडल्याचे निदर्शनास येत आहे...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या