🌟‘त्या’ हल्लेखोरांचा पोलिसांद्वारे एक दिवसात तपास : दोन हल्लेखोर ताब्यात तर चार जन फरार🌟
परभणी (दि.११ मे २०२३) : परभणी - वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील राहटी पुलावर दि.०८ मे २०२३ रोजी दुपारी ०४-३० वाजेच्या सुमारास भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) या जागतिक दर्जाच्या संस्थेच्या वैज्ञानिकावर तिन मोटारसायकलवर आलेल्या सहा हल्लेखोरांना हल्ला केल्याची भयंकर हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती या हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांना पोलिसांनी जोरदार तपास करीत ताब्यात घेतले असून पोलिसांनी केलेल्या तपासात नवरी मुलीचाच प्रियकर व त्याच्या मित्रांचा या हल्लेखोरांत समावेश आढळून आला दरम्यान नवरीमुलीसह तिचा प्रियकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य चौघे हल्लेखोर फरार आहेत.
स्वत:च्या लग्नासाठी परभणीत येत असलेल्या व इस्त्रोत वरीष्ठ वैज्ञानिक असलेल्या पंकज प्रकाश कदम यांच्यावर सोमवार दि.०८ मे २०२४ रोजी दुपारी ०४.३० वाजताच्या सुमारास जिवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कदम यांच्यावर उपचार सुरू आहेत. इस्त्रोमध्ये वरीष्ठ वैज्ञानिक असलेले पंकज कदम मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील रहिवाशी आहेत. त्यांचा विवाह परभणी येथील वसमत रोडवरील शिवराम नगरातील मुलीसोबत ठरला होता. दि.०९ मे २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता वरद गार्डन मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा होणार होता. या लग्नासाठी पंकज कदम आपल्या परीवारासह दि.०८ मे २०२३ रोजी येत होते. दुपारी ०४.३० च्या सुमारास त्यांचे वाहन राहटी नदीवरील पुलावर आले असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या सहा जनांनी नवरदेव पंकज यांचे वाहन थांबवले व पंकज यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. मदतीसाठी येणार्यांनाही हल्लेखोरांनी धमक्या दिल्या. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. जखमी पंकज कदम यांच्या हात, पाय, पाठीवर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार गणेश चव्हाण,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देवून चौकशी केली होती.
दरम्यान पंकज यांच्यावर चार ते पाच दिवसांपुर्वी नांदेड येथील रेल्वे स्टेशन जवळ हल्ला झाला होता. त्यानंतर परभणी येथे स्वतःच्या लग्नासाठी येत असताना त्यांच्यावर दुसर्यांदा हा हल्ला करण्यात आला, त्यामुळे हल्लेखोरांचे टार्गेट पंकज कदम असल्याचे लक्षात आले. दरम्यान, या हल्ल्याच्या प्रकरणातील हल्लेखोरांना पकडण्याकरीता परभणी,पूर्णा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जोरदार तपास मोहिम सुरु केली होती.....
0 टिप्पण्या