🌟परभणी तालुक्यातील इनामी जमिनींचा एका साल लावणी वर्षासाठी जाहीर लिलाव उद्या बुधवार दि.२९ मे रोजी....!


🌟या जमिनीच्या लिलावात इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार गणेश चव्हाण यांनी केले🌟

परभणी (दि.२९ मे २०२३) :  तालुक्यातील मंडळ अधिकारी पिंगळी, टाकळी कुंभकर्ण आणि झरी अंतर्गंत येणाऱ्या पिंपरी देशमुख, धर्मापुरी, पोरजवळा, जलालपूर आणि पिंपळा या गावांमधील इनामी जमिनींचे एक लावणी वर्ष २०२३-२४ साठी जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवारी (दि. ३१ मे) रोजी पार पाडली जाणार आहे. या जमिनीच्या लिलावात इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार गणेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

परभणी तालुक्यातील इनामी जमिनींचे २०२३-२४ या एका लावणी वर्षांच्या कालावधीसाठी पिंपरी देशमुख येथील इनामी जमीन गट नंबर १८३ मधील १२ हेक्टर १४ आर, धर्मापुरी येथील गट नंबर १९९ मधील १२ हेक्टर ६ आर, पोरजवळा येथील गट नंबर ६८ मधील ५ हेक्टर ५२ आर, जलालपूर येथील गट नंबर ६८ मधील २ हेक्टर ३० आर आणि पिंपळा येथील गट नंबर ७९ मधील ४ हेक्टर ४६ आर क्षेत्रफळाच्या जमिनीचा जाहीर लिलाव बुधवारी ३१ मे रोजी होणार आहे. 

ही इनामी जमीन लावणी वर्ष २०२३-२४ या एका वर्षासाठी होणाऱ्या लिलावासाठी जाहीर प्रकटन देण्यात येत असून, या जाहीर प्रकटनाची संबंधित गावात दवंडी देऊन प्रसिद्धी करावी. तसेच एक प्रत ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर डकवावी. या जमिनीचा लिलाव करून जलसा पटी व हर्रास पटी जाहीर प्रकटनाच्या प्रसिद्धी रिपोर्टसह सोमवार, दि. २९ मे २०२३ रोजी या कार्यालयात सादर करावी. या जमिनीचा लिलाव बुधवारी दि. ३१ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. लिलावावेळी आपण स्वत: उपस्थित राहावे तसेच जास्तीत –जास्त गरजू नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्याचे आवाहन परभणीचे तहसीलदार गणेश चव्हाण यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या