🌟पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयाचे लोकार्पण उद्या २६ मे रोजी.....!


🌟केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे उपस्थिती🌟

परभणी (दि.२५ मे २०२३): शहरातील १०० खाटांच्या जिल्हा स्त्री रुग्णालय व डी.आय.सी.च्या नवीन इमारतीचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. 

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी खासदार श्रीमती डॉ. फौजिया खान, खासदार संजय जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर विधान परिषद सदस्य सर्वश्री सतिश चव्हाण, अब्दुल्ला खान दुर्राणी, विक्रम काळे, विप्लव बाजारिया, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा अभि. संचालक धीरजकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, महानगरपालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, आरोग्य सेवा (मुंबई)चे संचालक डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक डॉ. महानंदा मुंडे आणि अधीक्षक अभियंता दीपाली भाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. 

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपअभियंता शेख अंजुम अख्तर, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता अल्ताफ  हुसेन अन्सारी, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कालिदास चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या