🌟तहसीलदार परेश चौधरी यांनी केली कार्यवाही🌟
जिंतूर (दि.१९ मे २०२३) - जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा जवळ अवैद्य वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक महसूलच्या पथकाने पकडला असून 5 ब्रास वाळू सह हायवा जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही दि.१७ मे २०२३ रोजी रात्री ०१-०० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून अवैद्य वाळू माफियांनी चोरट्या मार्गाने वाळू विक्रीचा व्यवसाय बिनबोभाट चालू आहे सध्या वाळू माफियांनी सर्वसामान्य नागरिकांना अवाच्या सव्वा दराने वाळू विक्री करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत मात्र जिल्हाधिकारी अंचल गोयल उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार परेश चौधरी यांनी गुप्त महितीच्या आधारावर औंढा जिंतूर महामार्गावरील आडगाव फाटा नजीक हायवा ट्रक क्र.एम.एच.४६ बिबी ४५५५ तपासणी केली असता यात अवैद्यरित्या वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले दरम्यान हायवा जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आले असून २ लाख ५८ हजाराचा दंडाची शिफारस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे या कार्यवाहीत मंडळ अधिकारी गजानन कणव,तलाठी पंकज पाटील,मन्मथ लासे,जगन घुगे महसूल सहाय्यक काळे हे सोबत होते.....
0 टिप्पण्या