🌟परभणीत भगवान तथागत बुध्दांच्या दोनशें मुर्त्यांच्या वाटप सोहळ्याचे आयोजन...!


🌟थायलंड देशातील भिक्खू संघाची होणार धम्मदेशना : सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीम गीताचा कार्यक्रम🌟


 
परभणी (दि.१६ मे २०२३) - काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वतीने दि.२७ मे २०२३ रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान जिंतूर रोड येथे सकाळी १०-०० वाजता दोनशे तथागत बुद्धमूर्ती वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी थायलंड देशातील भिक्खू संघाची धम्मदेशना व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या प्रबोधनपर भिम गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  


यावेळी पू.भदंत लाँगफुजी फ्रा सोंगसाक कोविदो,  पू.भदंत फ्रां  थोंगसुक तेप्पारियातीसूथी (थायलंड) , पू भदंत डॉ उपगुप्त महाथेरो (महासचिव अखिल भारतीय भिक्खू संघ ,महाराष्ट्र प्रदेश ) यांची प्रमुख धम्मदेशना होणार आहे. यावेळी कार्यक्रमास सिने अभिनेता गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे धम्मकार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध महिला मंडळ, उपासकाचा बुद्धमूर्ती देऊन सन्मान करण्यात येणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील  सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या प्रबोधनपर भीम गीताचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे.

 या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने महिला मंडळ, उपासक , उपासिका, युवा वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


                                       


                                           

                            

                .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या