🌟पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे उद्या ११ मे रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन....!


🌟संपूर्ण राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर धरणे आंदोलन🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : पत्रकारांच्या विवीध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे रोजी  संपूर्ण राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

        पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा,पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. 

         पत्रकारांच्या या मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर ११ मे रोजी सदर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्याच एक भाग म्हणून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया व जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर शहरात देखील तहसील कार्यालयासमोर  एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे जिंतूर  तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण यांच्या वतीने  एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या