🌟उन्हाळ्या असल्याने गर्मीचा उकाडा असल्यामुळे शेतकरी जळबाजी ढोणे कुटुंबासह घराबाहेर बाहेर झोपल्याने अनर्थ टळला🌟
पुर्णा (दि.३१ मे २०२३) : पुर्णा तालुक्यातील पांगरा तरंगल येथील शेतकरी जळबाजी माणिकराव ढोणे यांचे तरंगल शिवारात गट क्रमांक ५५ मध्ये शेतजमीन असून ते आपल्या शेतात वाटीच्या भिंती रचून तयार केलेल्या टिन पत्रे असलेल्या घरात राहतात काल मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी ते नेहमी प्रमाणे रात्रीचे जेवण करुन उन्हाळ्याचे दिवसांमुळे गर्मीचा उकाडा असल्याने घरात न झोपता घराशेजारी रिकाम्या जागेत कुटुंबीयासह झोपले होते. आज दि.३१ मे रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे ०३-०० वाजेच्या सुमारास घरातून जळाल्याचा फटफट आवाज आल्याने ते जागे झाले.यावेळी घरातून आगीचा लोळ दिसताच त्यांनी शेजारील शेतकऱ्यांना बोलावून घराचे दार उघडून लागलेली आग पाणी टाकून विझवली.
या आगीच्या भयंकर घटने नंतर घरात पाहीले असता आत मधील संघनक (कंम्प्युटर) संच,टिव्ही,कपडे,गव्हू,ज्वारी,तांदूळ, डाळी,बॅग,मध्य ठेवलेले नगदी दहा हजार रुपये आणि ईतर जिवनावश्यक वस्तू,महत्त्वाचे कागदपत्रे आगीत जळून भस्मसात होऊन सुमारे त्यांचे २ लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.सदरील आग ही अचानक लागून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.दरम्यान,घटनेची माहिती पांगरा सज्जाचे तलाठी यांना दिली आहे.त्यानूसार पोलिस पाटील गंगाबाई ढोणे,अंगद ढोणे,सरपंच उत्तमराव ढोणे,साहेबराव ढोणे यांनी घटनास्थळाची तात्काळ पाहणी करुन सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या