🌟पुर्णेत वीर शिरोमणी हिंदुधर्म योध्दा महाराणा प्रताप सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न...!


🌟यावेळी रक्तदान शिबिरामध्ये ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले🌟


पुर्णा (दि.२२ मे २०२३) - पुर्णा शहरातील अष्टभुजा माता मंदिर परिसरातील ठाकूर लाज येथे आज् दि.२२ मे २०२३ रोजी वीर शिरोमणी हिंदुधर्म योध्दा श्री महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४८३ व्या जयंती निमित्त सकाळी ११-०० वाजता ठाकुर लॉज येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते यावेळी वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंह जी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली  याप्रसंगी प्रमुख पाहुणे  ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम,नगराध्यक्ष संतोष एकलारे,हनुमान अग्रवाल, रत्नाकर गुट्टे मित्र  मंडळाचे ता.अध्यक्ष गणेश कदम,डॉ.अजय ठाकुर,भाजपा जिल्हा संयोजक विजय कराड़,मा.नगरसेवक राजू भालेराव,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रताप कदम,मनसेचे राज ठाकर,जिल्हा उपाध्यक्ष कपिल कदम,सुनील ठाकुर,सुनील डूबेवार,युवा शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर,राहुल डहाळे शिबिराचे आयोजक जयंती मंडल अध्यक्ष एड.गोविंद ठाकुर उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 35 रक्तदात्यांनी रक्तदान केलेहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सकल हिंदू समाज जयंती मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या