🌟परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद घटनेतील दोषींना मकोका लावा...!


🌟नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी🌟


नांदेड/परभणी (दि.३० मे २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद येथील उखळद-नवागड मार्गावरील ईदगाह वळणावर अल्पसंख्यांक सिख सिकलकरी समाजातील ३ चौदा ते १६ वर्षे वयोगटातील निष्पाप बालकांना नराधम टोळक्याकडून अत्यंत अमानुषपणे गंभीर स्वरुपाची जबर मारहाण करण्यात आली या घटने प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून केवळ ६ जनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली या घटनेचे परभणी/नांदेड जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात तसेच पंजाब दिल्ली आदी राज्यांमध्ये पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून आज मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हुजूरी साध संगत हुजूर साहीब नांदेडच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन या अमानवीय घटनेचा तिव्र शब्दात निषेध करीत राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी स्वरुपात निवेदन पाठवून घटनेतील दोषींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची व पिडीत कुटुंबांना आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली आहे.    


बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हुजूरी साध संगत हुजूर साहीब नांदेडच्या वतीने मुख्यमंत्री श्री.भाई एकनाथजी शिंदे व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत अल्पसंख्यांक सिख सिकलकरी समाजातील ३ नाबालिक मुलांवर अमानुष अत्याचार करीत एका १४ वर्षीय मुलाच्या झालेल्या हत्येची घटना म्हणजे हा 'मॉब लिचींगचा' प्रकार असून संघटीत नराधम टोळक्याने तिनही बालक अल्पसंख्यांक सिख धर्मीय सिकलकरी समाजातील असल्याने त्यांना जाणीवपूर्वक त्यांची धार्मिक विडंबना करीत त्यांची दस्तार अर्थात डोक्यावरील पगडी काढून त्यांच्या केसांची विटंबना (बेअदबी) करीत त्यांचे हातपाय एखाद्या जनावरा प्रमाणे दोरखंडाने बांधून अत्यंत निर्दैयीपणे त्यांच्या डोक्यात पोटात छातीत तोंडावर बुटासह लाता घालीत अमानुषपणे मारहाण केल्यामुले या तिघांमधील १४ वर्षीय बालक  किरपालसिंघ भोंड याचा जागीच मृत्यू झाला सदरील बालकाचा देह घटनास्थळी पडलेला असतांना देखील अन्य दोन बालकांना जमलेले नराधम चोर चोर म्हणून गंभीर स्वरुपाची मारहाण करीत असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या विडिओ वरुन निदर्शनास येते सदरील प्रकार अत्यंत गंभीर व मानुकीला काळीमा फासणारा असल्यामुळे या घटनेत सहभागी संपूर्ण नराधमांचा या गुन्ह्यात समावेश करुन त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मकोका) सह ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट कायद्या अंतर्गत कलम वाढवून हा खटला महाराष्ट्र शासनाने जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे तसेच या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेतील पिडीत बालकांच्या कुटुंबांचे महाराष्ट्र शासनाने पुनर्वसन करून मयताच्या कुटुंबास ५० लाख रुपये व जखमी बालकांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी देखील मागणी निवेदनात करण्यात आलेली असून या निवेदनावर बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी,सरदार जसपालसिंघ लांगरी,सरदार जसबीरसिंघ बुंगई,सरदार मनप्रीतसिंघ कारागीर,सरदार मनबीरसिंघ हंडी,सरदार बक्षीसिंघ पुजारी आदींच्या स्वाक्षरी असून या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह विशेष पोलिस महानिरिक्षक परिक्षेत्र नांदेड,परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर,नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक तथा राज्याचे माजी पोलिस महासंचालक सरदार परविंदरसिंघजी पसरीचा यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या