🌟पुर्णा शहरात मुलभूत नागरी सोयीसुविधांचा अभाव : भारतीय जनता पक्षाने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन....!


🌟निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना सोयीसुविधा पुरवल्या नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा🌟


पुर्णा (दि.१६ मे २०२३) - पुर्णा नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील नागरिक मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहत असल्यामुळे पुर्णा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष तथा परभणी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रशांत कापसे यांनी परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांना पुर्णा शहरातील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा तात्काळ पुरवण्यात याव्या या मागणी संदर्भात काल सोमवार दि.१५ मे २०२३ रोजी लेखी स्वरुपात निवेदन दिले.


पुर्णा शहर भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे यांनी जिल्हाधिकारी गोयल यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की शहरातील नागरिकांना गेत्या अनेक दिवसापासून नगर परिषदेच्या वतिने नागरी सोयीसूविधा मिळत नाहीत याचे मूळ कारण म्हणजे पुर्णा नगर परिषदेला मागील दोन महिण्यापासून कायम स्वरूपी मूख्याघिकारी नसल्यामुळे नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार टप्प झालेला आहे त्यामुळे गेत्या अनेक दिवसापासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन कोलमडत्यामूळे अनेक ठिकाणी कचरा/घाणीचे ढिगार साचली आहेत तसेच शहरातील सर्वच प्रभागांसह मुख्य बाजार पेठेतील देखील नाल्यांची साफसफाई नसल्यामूळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामूळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्मान होत आहे तर शहराच्या अनेक भागात पाणी पूरवठा व्यवस्थीत होत नाही आनंद नगर,आदर्श कॉलनी,तात्यासाहेब नगर,महाविद्यालय परीसर,अली नगर,अजिज नगर,नवीन आबादी भागातील पाणीपुरवठा सूरळीत नसल्यामुळे या भागातील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी वंचित राहत असल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यात यावी शहरातील विविध प्रभागांमध्ये जिल्हा नियोजन विकास समिती (डिपीडीसी) अंतर्गत सुरू असलेले विकासकामे निकृष्ट दर्जाचे व शासकीय अंदाजपत्रका (इस्टिमेट) प्रमाणे होत नसल्यामुळे त्या सर्व प्रस्तावित विकास कामांची सखोल चौकर्शी करूनच त्या विकासकामांची बिल अदा करण्यात यावी,पावसाळक्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांमधील गाळ काढून साफसफाई करण्यात यावी अन्यथा पावसाळयात सखल भागात पाणी साचून नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण वाढत आहे तसेच शहरामध्धे पंतप्रथान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेत्या घरकूल लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर तात्काळ रक्कम वर्ग करण्यात यावी,शहरातील नागरीकांना पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या अमृत २.० योजनेची तात्काळ अमल बजावनी करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे यांच्या निवेदनावर जिल्हाधिकारी आंचल गोयल काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून भाजपा कडून देण्यात आलेल्या निवेदना असेही म्हटले आहे की प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन पुर्णा शहरातील नागरिकांना निवेदनात नमूद मुलभूत नागरी सुविधा पुरवल्या नाही तर भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या