🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप शासन करणार नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती..!


🌟मुख्यमंत्री शिंदे यांनी २२ जिल्ह्यांच्या निर्मितीसह पुर्णा तालुक्याचा नांदेड जिल्ह्यात समावेश केल्याची घोषणाही करावी🌟 

महाराष्ट्र राज्याचे अत्यंत धाडसी लोकप्रिय मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा सरकारणे राज्यात निर्धारीत नवीन २२ जिल्हा निर्मितीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून या नुतन २२ जिल्ह्यांच्या निर्मिती नंतर अनेक तालुके नवीन जिल्ह्यांमध्ये जोडले जाणार आहेत मागील अनेक दशकापासून राज्यात तब्बल २२ नवीन जिल्हे स्थापण करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. राज्यामध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना पूर्ण दिवस घालावा लागत असल्यामुळे नवीन जिल्हा निर्मिती करावी आणि ती करण्यासाठी प्रस्तावना देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी,अलिबाग आणि बॉम्बे हे दहा जिल्हे होते 01 मे 1960 ला दुभाषिक मुंबई राज्याचा विभाजन झाला आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरातची निर्मिती झाली.महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर राज्यात पहिले २६ जिल्हे महाराष्ट्रामध्ये आले त्यामध्ये ठाणे,कुलाबा (आत्ताचे रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड,परभणी, धाराशिव (उस्मानाबाद), नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर,धुळे,पुणे,सांगली,सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव,भंडारा, चांदा (आत्ताचे चंद्रपूर) या २६ जिल्ह्यांचा नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात समावेश होता त्यानंतर राज्यात पुन्हा १९८१ पासून ते आत्तापर्यंत आणखी नवे दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली या नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीतून-सिंधुदुर्ग निर्माण झाला, छत्रपती संभाजीनगर मधून जालना,धाराशिव मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली, बृहन्मुंबई मधून मुंबई उपनगर, अकोला मधून वाशिम,धुळे मधून नंदुरबार, परभणी मधून हिंगोली, भंडारा मधून गोंदिया आणि ठाण्यामधून पालघर असे दहा जिल्हे निर्माण झाले.

महाराष्ट्रातील निर्धारीत २२ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या विभाजनातून किनवट जिल्हा निर्मितीचा देखील समावेश असल्यामुळे नांदेड-परभणी जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा धुरा समजल्या जाणाऱ्या पुर्णा तालुक्यातील जनसामान्यांच्या मनात आशेचा किरण पुन्हा एकदा जागृत झाला असून नांदेड पासून अवघ्या २८ किलोमीटर अंतरावर असलेला या पुर्णा तालुक्याचा कारभार नांदेड जिल्ह्यावर अवलंबून असून पुर्णा तालुका परभणी जिल्ह्यात असतांना देखील पुर्णा तालुक्यातील व्यापारी उद्योगपती शेतकरी शासकीय/निमशासकीय कर्मचारी आपला सर्व आर्थिक व्यवहार नांदेड येथूनच करण्यास प्राथमिकता देतात हे विशेष साडेचार दशकापुर्वी हिंगोली-परभणी संयुक्त जिल्हा असतांना या संयुक्त जिल्ह्यात शैक्षणिक/कृषी/व्यापार/उद्योग/सहकार क्षेत्रात सर्वात सधन असलेल्या या तालुक्याचा सर्वांगिन विकास करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याऐवजी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या तालुकाला संपूर्णतः विकासापासून वंचित ठेवण्याचेच काम केले त्यामुळे साडेचार दशकात हा तालुका अक्षरशः भकास झाल्याचे पाहावयास मिळत असून किनवट जिल्हा झाल्यानंतर पुर्णा तालुक्याचा समावेश नांदेड जिल्ह्यात करण्याची मागणी पुढे येवू लागली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या