🌟पुर्णेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा....!


🌟वाढदिवसा निमित्त शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्नांना फळांचे वाटप🌟 


पुर्णा (दि.१० मे २०२३) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त आज बुधवार दि. १० मे रोजी  सकाळी ११:०० वाजता वंचित बहुजन आघाडी पुर्णा च्या वतीने शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्नांना फळांचे वाटप करण्यात आले आहे. 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त वंचित बहुजन आघाडी पूर्णा च्या वतीने शासकीय रुग्णालय पूर्णा येथील रुग्णांना फळ वाटप करून बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे तर त्याचे निष्ठावंत  कार्यकर्ते व युवक वंचित बहुजन आघाडी पूर्णा चे शहर उपाध्यक्ष अजय काळे यांच्या वतीने आज पूर्ण दिवस मोफत ऑटोरिक्षा सुविधा देण्यात आली  त्या प्रसंगी ॲड. हिरानंद गायकवाड जि सचिव परभणी रवी वाघमारे जि सचिव परभणी तुषार गायकवाड युवा जिल्हा महासचिव परभणी मा. शमसुंदर काळे तालुकाध्यक्ष पुर्णा,मसरद शेख शहर अध्यक्ष पुर्णा ॲड. सिद्धांत गायकवाड,अजय काळे युवा शहर उपाध्यक्ष पुर्णा, विजय खंडागळे तालुका महासचिव पुर्णा, सुकेशनी गोधने महिला आघाडी पुर्णा प्रबुद्ध काळे शुभम डहाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या