🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथून श्री संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांसह पालखीचे प्रस्थान....!


🌟कान्हेगावात चार दिवसाच्या कालावधीत गावकऱ्यांनी अन्नदान करुन सन्मान केला🌟

पुर्णा (दि.२० मे २०२३) - पुर्णा तालुक्यांतील मौजे कान्हेगाव येथे बुधवार दि.१६ मे २०२३ रोजी श्री संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांसह पालखीचे आगमन झाले होते दि.१६ ते २० मे या चार दिवसाच्या कालावधीत गावकऱ्यांनी अन्नदान करुन सन्मान केला श्री संत बाळूमामा यांना कान्हेगाव येथे असण्यासाठी शिदोरी घेऊन ग्रामस्थ दि.१६ मे २०२३ रोजी कानखेड येथे गेले होते.


श्री संत बाळूमामा यांना आपल्या कान्हेगाव या गावामध्ये  आणण्याचे काम हे गावातील सुरेश पिसाळ,पांडुरंग पारटकर,बालाजी पारटकर,जयराम मोरे,नारायण पैलवान यांनी केले चार दिवस कान्हेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज शनिवार दि.२० मे २०२३ रोजी पुढील गावामध्ये जाण्यासाठी श्री संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांसह पालखीचे प्रस्तान झाले यावेळी सर्व गावकरी मंडळींनी बँड पथक लाऊन सन्मानाने पुढील गावात जाण्यासाठी निरोप दिला....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या