🌟गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयात करिअर समुपदेशन शिबीराचे मंगळवार दि.३० मे रोजी आयोजन....!


🌟शिबिराचे आयोजन केल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी.एच.लोंढे यांनी कळविले आहे🌟

परभणी (दि.२९ मे २०२३) :  राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी सकाळी ०९-०० वाजता गंगाखेड येथील संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर समुपदेशन शिबिराचे आयोजन केल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी.एच.लोंढे यांनी कळविले आहे.  

राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या समुपदेशन मेळाव्यामध्ये १० वी / १२ वी नंतर काय?. भविष्यातील रोजगार संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगार संधी इत्यादीबाबत विविध क्षेत्रातील तज्ञ, प्रोफेसर, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, यशस्वी उद्योजक यांच्यामार्फत मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या योजना, बँक, वित्तीय संस्था, रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणारी शासनाची महामंडळे, आयुक्तालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्याकडील योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर समुपदेशन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य लोंढे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या