🌟परभणी जिल्ह्यातील पुर्णा जंक्शन रेल्वे प्रशासनाचा कारभार बोचरा रेल्वे स्थानकासह परिसरात सर्वत्र साचला प्रचंड कचरा....!


🌟रेल्वे प्लाटफार्म क्र.०४ लगत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाराला अज्ञात व्यकीने लावली ०२ वेळेस आग : रेल्वे प्रशासना केव्हा येईल जाग ?🌟


परभणी (दि.२१ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा जंक्शन जंक्शन रेल्वे स्थानकाला दक्षिण मध्य रेल्वे नांदेड डिव्हीजन मध्ये कोणी वाली उरला की नाही ? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून मराठवाड्यातील सर्वात महत्वाचे व सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णा जंक्शनची अवस्था बेवारस असल्यागत झाल्याचे निदर्शनास येत असून याशारेल्वे स्थानकावर स्वच्छतेसह प्रवासी व मालमत्ता सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न सातत्याने गंभीर होत चालल्याचे दिसत आहे.


   
पुर्णा शहराच्या दिशेने असलेल्या प्लाटफॉर्म क्रमांक चार रेल्वे स्थानकासह आसपासचा संपूर्ण परिसर कचऱ्यांच्या ढिगारांनी वेढला गेल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असतांनाच या साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगारांना अज्ञातांकडून सातत्याने आग लावण्याचे गंभीर प्रकार होतांना दिसत आहे मागील दोन महिण्यापुर्वी १३ मार्च २०२३ रोजी रेल्वे स्थानक क्रमांक चार लगतच्या कचरा ढिगाराला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्याचा प्रकार घडला होता आगीचा डोंब इतका भयानक होता की परिसरात अक्षरशः भितीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच पुन्हा काल शनिवार दि.२० मे २०२३ रोजी सायंकाळी ०७-०० ते ०७-३० वाजेच्या सुमारास याच परिसरातील कचऱ्याच्या ढिगाराला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्रकार घडला या घटने संदर्भात रेल्वेच्या स्वच्छता अधिकारी यांना काही जागृक नागरिकांनी कळवल्या नंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळावर येवून आग विझवली खरी परंतु सातत्याने असे प्रकार घडत असल्यामुळे दोन वेळेस अनर्थ टळला असला तरी भविष्यात रेल्वे प्रशासनाने काही ठोस उपाययोजना केली नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो यात तिळमात्र शंका नाही.....          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या