🌟जिंतूर तालुका कृषी अधिकारी काळे यांची बदली : बीज परीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती....!


🌟छत्रपती संभाजी नगर येथे पदोन्नती वर बीज प्रशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२९ मे २०२३) - तालुका कृषी अधिकारी यांची छत्रपती संभाजी नगर येथे सामान्य प्रशासन यांच्या १७ मे २०२३ च्या आदेशान्वये कृषी,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातर्फे जितुर वरून छत्रपती संभाजी नगर येथे पदोन्नती वर बीज प्रशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झालेली आहे.

   काळे यांनी जिंतूर येथे जवळपास ५ वर्ष कार्यक्षम अधिकारी म्हणून यशस्वीपणे आपली कृषी अधिकारी पदावरील कारकिर्द जिंतूर येथे पार पाडली. वरिष्ठ अधिकारी,कार्यालयीन कर्मचारी व शेतकरी यांच्याशी नेहमी समन्वय साधत चोख पाच वर्षे सेवा त्यांनी बजावली.त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्या बदल त्यांचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.

    विशेषतः सोयाबीन बियाणे उत्पादन ग्रामबीजोउत्पादन मोहीम 2020 मध्ये त्यांनी विशेष भरीव योगदान दिल्या बद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलेले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या