🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* इस्त्रोने नेव्हिगेशन उपग्रह NVS01 चे श्रीहरिकोटा येथून केले यशस्वीरीत्या केले प्रक्षेपण, इस्त्रोकडुन येत्या 12  जुलैला चांद्रयान --  3 चे प्रक्षेपण करण्यात येणार. 

* दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय: 2,000 रुपयांच्या नोटा रिक्विजिशन स्लिप, आयडी प्रूफशिवाय बदलण्याच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका फेटाळली.

* डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 12 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी, हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप

* भारतातील सीएनजी स्टेशन दोन वर्षांपूर्वीच्या 1,500-2,000 वरून आता 5,500 पर्यंत वाढले; सीएनजी कारच्या वाढत्या लोकप्रियतेत वाढ

* सीबीआयने 'लम्हा' चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध नोंदवला एफआयआर, कथित बँक फसवणूकप्रकरणी कारवाई

* मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले; कोणतीही जीवितहानी नाही - मध्य प्रदेश पोलिसांची माहीती

* पुढील 2 वर्षांत 200 विमानतळ बांधणार, भारत 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार - केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे  

* आशिया कप: BCCI चा हायब्रिड मॉडेलला पाठिंबा नाही, आशिया कपविषयी अद्याप निर्णय नाही; श्रीलंका-बांगलादेश देश भारताच्या पाठिशी

* काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन. 

* संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर, 11 तारखेला श्रीक्षेत्र आळंदीवरुन होणार प्रस्थान

* गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड बंधनकारक; 1 ऑगस्टपासून नियम लागू

* मुंबईत जमावबंदीचे आदेश, 11 जूनपर्यंत निर्बंध लागू राहणार.

* मध्य प्रदेशातील भिंडमध्ये अपाचे फायटर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; तांत्रिक बिघाडामुळे शेतात उतरवण्यात आलं

* डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी.

* युगांडात राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी अँटी-एलजीबीटीक्यू विधेयकावर केली स्वाक्षरी, एलजीबीटीक्यू आता गुन्हा म्हणून ओळखला जाणार.

* दिल्ली पुन्हा हादरली! शहरातील शाहाबाद डेअरी परिसरात 16 वर्षीय साक्षी नावाच्या तरुणीची, 21 वेळा चाकुने भोसकून व दगडाने ठेचून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, आरोपी युवकाला उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरातून अटक. 

* काँग्रेसचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन. 

* राज्यातील काँग्रेसचे  खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. रविवारी खासदार धानोरकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील अरिहंत रुग्णालयातून विशेष एअर अ‍ॅम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी वेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.

* उज्जैन मधल्या महाकाल कॉरिडॉरमध्ये प्रचंड वादळात सप्तऋषींच्या 6 मूर्तींचं नुकसान.

* 11 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कॉरिडोरचं उद्घाटन केलं होतं, 856 कोटी रुपयांचा प्रकल्प*

* 2 दिवसात सर्व पूर्ववत होईल असा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा.

*किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल, अनिल परब यांचा इशारा.

* किरीट सोमय्या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करत आहेत. आरोप करून सोडून द्यायचे आणि मग अशी प्रकरणे अंगलट येताहेत असं दिसलं की ते मागे घ्यायचे. हरित लवादात हे प्रकरण सुनावणीला आलं तेव्हा या प्रकरणात काही तथ्य नाही. आम्ही हे प्रकरण डिसमिस करत आहोत असं जेव्हा न्यायमूर्तींनी सांगितलं तेव्हा आपली अब्रू जाईल या भितीने किरीट सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

* पुण्यात गारांसह पावसाला सुरुवात : पुण्यात गारांसह पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील पाषाण भागामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच कोथरूड, बाणेर, औंध, आणि विद्यापीठ परिसरात मोठा पाऊस सुरु झाला आहे.

* अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना नऊ महिने होऊनही मिळालेली नाही.

* ‘ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीची मदत बाधित शेतकऱ्यांना नऊ महिने होऊनही अजून मिळालेली नाही,  आता सरकारने अतिवृष्टीची भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’चे बंधन घातले आहे.

* राज्यात पंचनाम्यांच्या पद्धतीत सुधारणा करून मोबाईल ॲपद्वारे पंचनामे करावेत, ई-पंचनाम्यानुसार 15 दिवसांत बाधितांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था तयार करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना.

* शेअर बाजार: सेन्सेक्स 344 अंकांनी वाढून 62,846.38 अंकांच्या पातळीवर बंद, तर निफ्टी 99 अंकांनी वाढून 18,598.65 अंकांवर बंद

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55,550 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60,600 रुपये.

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या