🌟भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी मुलाखतींचे आयोजन....!


🌟सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास,भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे🌟

परभणी (दि.18 मे 2023) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 29 मे ते 07 जून, 2023 या कालावधीत SSB कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे. 

जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी येथे दि. 22 मे, 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी फेसबूक  पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करुन त्यामधील SSB-53 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पूर्ण भरून सोबत घेवून येणे आवश्यक आहे.

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक असून, त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावे. कम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सटिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत. तसेच एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असणे आवश्यक आहे.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी pctcoic@yahoo.in व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 असून, कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, परभणी यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या