🌟परभणीत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची उद्या १० मे रोजी मराठवाडा विभागीय बैठक....!

🌟अशी माहिती किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रफुल्ल पाटील व प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे यांनी दिली🌟

परभणी (दि.०९ मे २०२३) : परभणी येथे उद्या बुधवार दि.१० मे २०२३ रोजी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाची मराठवाडा विभागीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील व प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे यांनी दिली आहे.

              भाजपाच्या किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी संपर्क महाअभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने त्याचे नियोजन व पूर्व तयारीकरीता मराठवाडा विभागातील प्रदेश पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस, शेतकरी संपर्क महाअभियानाचे पदाधिकारी पदाधिकारी-कार्यकर्ते व अपेक्षित पाहुण्यांची व्यापक बैठक पाथरी रस्त्यावरील डॉ. प्रफुल्ल पाटील शैक्षणिक व हॉस्पिटल परिसरातील सभागृहात बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजता होणार आहे. या विभागीय बैठकीस किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, अभियानाचे प्रदेश सहसंयोजक तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, प्रदेश समन्वयक रंगनाथ साळुंके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या