✍🏻कविता : आईची महती...!
कुणी सांगाल का मला, आईची महती।
कळे पुसता पोरक्या बाळा, आई ना जगती।
सुख दुःखाचा साथी शास्वत प्रेममूर्ती।
अश्रू पुसे ना कोणी, ओठ टेकी ना माथी।
रडो पडो चरफडो मी कवटाळी कुणी ना छाती।
यास कारण घरी ना दारी एक ती वात्सल्यमूर्ती।१।
परीक्षेस निघताना कोठे टेकू मस्तक।
पडतो घराबाहेर न जोडताचि हस्तक।।
घरी नाही आशीर्वाद भंडार आई ती।
मग मी व्यर्थचि काय पाडू हाती।२।
जग रडे ओक्साबोक्सी जात आईच्या कुशी।
अश्रूंना मोकळी वाट मी देतो कोपऱ्याशी।
भाग्य फुटले माझे हिरावली संस्कार शिदोरी।
देवा कारे चोरली माझी संस्कारमूर्ती आई।४।
तीच्या चरणी समस्त सुखांची वस्ती।
माऊली संबोधून शोधू पाहती
माता सर्व गुणसंपन्न जगी असे ख्याती।
भक्त, गुरू, देव यांनाही माऊली म्हणती।
जरी मी त्रिलोक जिंकेन, राज्य विस्तारेन।
तरी मी कदापि आईशी शोधू शके ना।
मायबाप वरद डोई तोचि होतसे चक्रवर्ती।
म्हणून श्रीकृष्णदास गातसे आईची कीर्ती।५।
श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
प. पू. गुरुदेव हरदेव कृपानिवास, रामनगर.
गडचिरोली, मोबा- ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या