🌟पुर्णा न.पा.जवळील डॉ.जाकीर हुसेन चौकात होत असलेल्या नियमबाह्य सिमेंट नाली/रस्त्याचे काम नागरिकांनी रोखले...!


🌟संतप्त नागरिक व गुत्तेदारात शाब्दीक चकमक : अखेर रस्त्याच्या मध्यभागात बनवण्यात येत असलेली सिमेंट नाली काम रद्द🌟


पुर्णा (दि.३१ मे २०२३) - पुर्णा शहरातील विविध प्रभागांमध्ये निकृष्ट व बोगस सिमेंट रोड/सिमेंट नाली बांधकाम करीत कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीचे सोईस्कररित्या विल्हेवाट लावण्याचे काम युध्द पातळीवर चालत असून यातील जवळपास ९०% विकासकाम बोगसच होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक या कामांकडे बघून भ्रष्ट नगर परिषद प्रशासनासह या प्रभागांतील जनमतावर निवडून आलेल्या नावाने संतापाच्या भरात अक्षरशः बोट मोडत असतांना आज बुधवार दि.३१ मे २०२३ रोजी दुपारच्या सुमारास पुर्णा नगर परिषद परिसरातील डॉ.जाकीर हुसेन चौकातील नियमबाह्य रस्त्याच्या मध्यभागातून होणारे सिमेंट नाली बांधकाम व रस्त्याचे लाखो रुपयांच्या निधीतून होत असलेले काही संतप्त नागरिकांनी रोखल्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी या संबंधित गुत्तेदार व गुत्तेदार समर्थक तसेच बेकायदेशीर कामाला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये शाब्दीक चकमक देखील झाली.    

   


या संदर्भात सविस्तर वृत्त असे की शहरातील नगर परिषद परिसरातील डॉ.झाकीर हुसैन चौक येथे काल मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी सिमेंट नालीसह रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्यासाठी खोदकाम करण्यात आले तसेच रस्त्याच्या ऐन मध्यभागी मोठ्या नालीसह पक्क्या सिमेंट रोडचे देखील जेसीबीने खोदकाम करण्यात आले या कामामुळे रेल्वेने येणाऱ्या प्रवासी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना वाहन धारकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


शहराच्या विकासाच्या नावावर शासकीय अंदाजपत्रकांना मुठमाती देऊन नियमबाह्य व निकृष्ट कामे करीत सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याच्या या प्रकारामुळे आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला यावेळी नागरिकांनी काम बंद पाडत अंदाजपत्रकाची देखील मागणी केल्यामुळे गुत्तेदारासह काही पडद्यामागील गुत्तेदार देखील रस्त्यावर उतरल्यामुळे शाब्दीक चकमकीला सुरुवात झाली यावेळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गुत्तेदाराने सदरील नालीकाम थांबवून साईडने नालीचे काम करण्यात येईल असे नागरिकांना सांगितले असले तरी नियमबाह्य निकृष्ट दर्जाचे विकासकाम कद्दापी खपवून घेतले जाणार नाही असा संतप्त दम नागरिकांनी दिल्यामुळे भ्रष्ट गुत्तेदाराच्या पाचावर धारण जरी बसली असली तरी अश्या निकृष्ट व नियमबाह्य कामांचे समर्थन मिलबाटके तत्वांचा अवलंब करीत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या प्रभारी मुख्याधिकारी लोमटे,नुकताच पदभार सोडलेले नियमबाह्य प्रभारी नगर अभियंता सिध्दार्थ गायकवाड नगर अभियंता देशमुख,सब ओव्हरसिअर संजय दिपके यांच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.....        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या