🌟महाराष्ट्र ग्रामीण सडक योजनेच्या कामांचे कंत्राटदार व्हि.टी.पाटील कंन्स्ट्रक्शन यांच्या नावाचा काळ्या यादीत समावेश करा...!


🌟रिपब्लिकन सेनेकडून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन🌟 


पुर्णा (दि.१८ मे २०२३) :- पुर्णा तालुक्यातील मौ.धनगर टाकळी-कंठेश्वर,कानखेड,धोत्रा या गावांच्या मुख्य रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होत असून सदरील रस्त्याच्या कामांचा शासन निर्धारीत कालावधी संपल्यानंतर देखुल या रस्त्यांची काम अद्याप देखील पुर्ण झालेली नाही या कामांचे कंत्राटादार व्हि.टी. पाटील कंन्स्ट्रक्शन यांचा तात्काळ सखोल चौकशी करुन त्यांचा रजिस्ट्रेशन रद्द करण्याचेआदेश जारी करुन त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्यात यावा अशी मागणी आज गुरुवार दि.१८ मे रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने शहराध्यक्ष चंद्रमुनी लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.


पुर्णा तालुक्यात होत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मोजे धनगर टाकळी ते कंठेश्वर कि.मी. 0/00 ते कि.मी.2700 ता. पूर्णा रस्त्याची सुधारणा करणे किंमत 126.56 लक्ष, राज्य महामार्ग 61 ते कानखेड रस्ता दर्जाहीन करणे कि.मी. 000 ते O/900  अंदाजे किंमत . 48.97 लक्ष व .इ.जि.मा 0/8 ते धोत्रा रस्ता दर्जाहीन करणे कि.मी. 0oo ते 2800 अंदाजे किंमत 119.90 लक्ष या  सर्व रस्त्याच्या कामांची  सुरुवात करण्याचा दि. 18.08.2021 व काम पूर्ण करण्याचा दि.17.08.2022 रोजी शासनाने ठरवून दिला असताना या रस्त्याचे काम कार्यकाळ उलटूनही काम 50%  पुर्ण झाले नाही व रस्त्याचे काम हे खोदकाम करुन मुरुम व मोठ मोठ्या गिट्टीचा थर टाकण्यात आला व वाहन धारकांना ये-जा करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे व  अपघात होण्याची  शक्यता  आहे. या रस्त्याचे काम कंत्रातदार  व्ही.टी.पाटील औरंगाबाद यांना देण्यात आले होते. पण त्यांनी हे काम एका स्थानिक गुत्तेदारांना दिले, ते स्थानिक गुत्तेदारांना काही कामाबद्दल विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवून आडमुठी धोरण वापरत आहेत. तसेच कार्यन्वीत यंत्रणा कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, परभणी यांना सुध्दा लोकांनी काही विचारपूस व कामाची माहिती विचारली  असता यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व कामाची कुठलीच माहिती दिली नाही व काम कधी पूर्ण होणार हे देखील सांगितले नाही.तरी या सर्व रस्त्यांच्या कामाची स्वतः जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी  स्वतःहून लक्ष दिवून व पाहणी करुन संबंधित गुत्तेदारांची व अधिकार्यांची चौकशी  तक्रारदाराच्या समक्ष करुन योग्य ती  कारवाई करावी व दोषी आढळल्यास गुत्तेदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष चंद्रमुनी लोखंडे यांनी निवेदनात केली आहे त्यावेळी शहिद भगतसिंह युथ ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष कुंदन ठाकुर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या