🌟पुर्णा तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस....!


🌟तालुक्यात तब्बल एक तास पावसाने घातला धुमाकूळ : अनेक नागरिकांचे संसार आले उघड्यावर शेतकऱ्यांचे नुकसान🌟 


पुर्णा (दि.०२ मे २०२३) - पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आज मंगळवार दि.०२ मे रोजी दुपारी ०३-०० ते ०४-०० वाजेच्या सुमारास पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला तब्बल एक तास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली तालुक्यातील धनगर टाकळी गौर चुडावा परिसरात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने इलेक्ट्रिक पोल तसेच झाड कोलमडून पडली या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पाऊसात झाड पडून एका बैलाचा देखील मृत्यू झाला.


गौर धनगर टाकळी भाटेगाव परिसरातील विजेचा विद्युत पुरवठा करणारे अनेक पोल कोलमडून पडले तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आखाड्यावरील जनावरांच्या गोठ्यांवरील झोपड्यांवरील तसेच गाव परिसरातील घरांवरचे पत्रे उडून गेली अनेक तर मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले अनेक झाडे देखील उपटून पडली गौर परिसरातील झोपड्या अक्षरशः पालापाचोळ्या प्रमाणे उडून गेल्या त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले व संसार उपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले.


तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे पावसाने माजवलेल्या हाहाकारात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हळदीचे पीक सडून जात आहे टरबुज खरबुज मिरची भाजी पाला पिकांचे अवकाळी पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे ३३ केव्हीचे मेन पोल पडल्यामुळे बऱ्याच गावांचा विद्युत पुरवठा देखील खंडीत झाला आहे.


तालूक्यातील ग्रामीण भागासह शहरात देखील मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्या नाल्यांचे स्वरुप आल्याचे पाहावयास मिळाले अनेक व्यवसायिक प्रतिष्ठानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांनाही दुकानांतील पाणी काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणी यावेळी दुकानांमधील सामानांचे देखील नुकसान झाले तालुक्यातील  मागील सात दिवसा पासून सतत चालू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतातील पिके अक्षरशः नासू लागली असल्यामुळे महसुल प्रशासनाने तात्काळ पंचणामे करुन करून शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी व सर्वसामान्य  नागरिकातून होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या