🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सदस्य रंगनाथ भोसले यांचा सत्कार...!


🌟तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आला नवनिर्वाचित सदस्य श्री.भोसले यांचा सत्कार🌟


पुर्णा (दि.०४ मे २०२३) - पुर्णा तालुक्यातील ताळकलस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य पदावर निवडून आलेले रंगनाथ भोसले यांचा आज गुरुवार दि.०४ मे २०२३ रोजी पुर्णा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे यांच्या निवासस्थानी परभणी जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरेशी व काँग्रेस सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे यांच्या हस्ता सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या