🌟कर्नाटकी विजयाचा गंगाखेडात आनंदोत्सव साजरा.....!


🌟शहरात पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी🌟


गंगाखेड (दि.१३ मे २०२३) :- कर्नाटक विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयाचा गंगाखेड येथे कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतीषबाजी करत हा आनंद साजरा करण्यात आला. 


कर्नाटक विधानसभा निवडणूकीत दुपारनंतर कॉंग्रेसचे बहुमत सिद्ध झाले. यानंतर गंगाखेड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी जमा झाले. ‘कर्नाटक तो झाकी है, सारा भारत अभी बाकी है,’ अशा घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणाही या प्रसंगी देण्यात आल्या. यानंतर एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कर्नाटकातील विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊत्साह संचारला असून विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढला असल्याच्या भावना याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. 


कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे, शिक्षकसेना राज्य सचिव बाळासाहेब राखे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माधव भोसले, विधानसभा अध्यक्ष श्रीकांत भोसले, माजी नगरसेवक राजकुमार सावंत, लिंबाजी देवकते, शिवसेना शहरप्रमुख जितेश गोरे, युवासेनेचे संदिप राठोड, माजी नगरसेवक प्रमोद मस्के, युवक कॉंग्रेसचे राज्य सचिव सिद्धार्थ भालेराव, बंडू ओझा, डॉ. देविदास चव्हाण, दत्तराव भोसले, दत्तराव भिसे, अजीजभाई, भीमराव बिलापटे दादा, राजू घोगरे, सुरेश साळवे, मोहन खोले, आदिंसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी ऊपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या