🌟पुर्णा शहरात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचे थाटात उद्घाटन.....!


🌟शहरातील ३५ ते ४०% गोरगरीबांना मिळणार मोफत आरोग्य सुविधांचा लाभ🌟


🌟शिवसेना शिंदे गटाचे नेते हाजी कुरेशी,युवा नेते सईद खान शिवसेना पदाधिकारी अंकित कदम, प्रविण अग्रवाल यांच्या प्रयत्नांन यश🌟


पुर्णा (दि.०१ मे २०२३) - पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरापासून तब्बल तिन किलोमीटर अंतरावर पुर्णा-ताडकळस राज्य मार्गावर असल्यामुळे शहरी भागातील ३५ ते ४० टक्के सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासकीय आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत होते मागील अनेक वर्षापासून शहरात एखादे प्राथमिक उपचार केंद्र व्हावे अशी जनसामान्यांची मागणी होती परंतु या अत्यंत महत्वपुर्ण मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी राज्यात विविध भागात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजने अंतर्गत पाचशें आरोग्य केंद्रांची घोषणा केली अन् पुर्णेकारांना आशेचा किरण दिसला जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरीकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" ही योजना सरकारकडून सुरु करण्यात आली असून परभणी जिल्ह्यात सात आरोग्य केंद्रांना मान्यता देण्यात या योजने अंतर्गत आज सोमवारी महाराष्ट्र दिन ०१ मे २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले यात पुर्णा शहराचा देखील समावेश करण्यात आला.


       राज्यातील प्रत्येक शहरात  "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" योजने अंतर्गत  सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.त्याच अनुषंगाने पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते हाजीसाहब कुरेशी व शिवसेना युवा नेते सईद खान, माजी नगरसेवक प्रविण अग्रवाल,शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अंकीत कदम यांनी शहरात ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठी प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दवाखान्यास मंजुरी दिली आहे.त्यामुळे येथील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळण्याची सोय झाली आहे. या योजनेतील दवाखाना  पालिकेच्या जुन्या ईमारतीत स्थापित करण्यात आला असून, दवाखान्याचे आज १ में रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आँनलाईन पद्धतीने उद्घाटन करुन रुग्ण सेवेसाठी खुला केला आहे. संपन्न झालेल्या कार्यक्रमास गटविकास अधिकारी जे.व्हि. मोडके, जिल्हा बाल संगोपन अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गिनगिने, डॉ.गजानन राऊत, डॉ. मनोज दीक्षित, डॉ. कल्पना आळणे आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी  इरशाद खान, माधव आवरगंड,  संतोष कठाळे, सदानंद गडगीळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आलिया शहेवार, अश्विनी चिंचोलकर, एस एस चौरंगे, अविनाश कांबळे व  अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या