🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर, दिल्लीला गेल्याची चर्चा, मात्र शरद पवारांनी केला इन्कार🌟

 ✍️ मोहन चौकेकर                          ‌      

* शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे 

* मी पुन्हा येईन म्हटले की येतोच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुचक वक्तव्य 

* माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बारसु येथील सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही चर्चा खरी नसल्याचे केले स्पष्ट  

* साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर तर जगात तिसऱ्या क्रमांकावर ; कारखान्यांकडून 244 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती

* शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर, दिल्लीला गेल्याची चर्चा, मात्र शरद पवारांनी केला इन्कार

* महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा; पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाडा, परभणी, लातूर, हिंगोलीमध्ये या भागांत गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त

* शरद पवारांचा राजीनामा फेटाळणे अपेक्षितच होते, लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी राजकारणात राहावे, पक्षाचं नेतृत्व करावं, शरद पवारांचा राजीनामा हा व्यक्तीगत विषय असू शकत नाही - संजय राऊत

* शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य 

* देशात गेल्या 24 तासांत 3,611 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन 33,232 वर - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ताजी आकडेवारी

* जपानमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप,आज दुपारी 2.42च्या सुमारास Ishikawa भागात बसला धक्का ; भूकंपानंतर Tsunami चा धोका नसल्याचे स्पष्ट

* जो पर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तो पर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची -- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

* महाराष्ट्रामध्ये गेल्या 62 वर्षात  पडला नाही तेवढा पाऊस या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पडला हवामान खात्याने दिली माहिती 

* जम्मू-काश्मीर राजौरीतील दहशतवाद्यांच्या चकमकीत आतापर्यंत 5 भारतीय जवान शहिद

* कल्याण डोंबिवलीत पुढील तीन महिने सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

* दुखापतीमुळे केएल राहुल आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधुन बाहेर, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख केले व्यक्त

* ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरवर यूट्यूबची कारवाई अदा शर्मा म्हणाली - सत्यमेव जयते

* नवी दिल्लीत चोविसाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचं बक्षिस वितरण

* ऑपरेशन कावेरी अंतर्गत ५९ नागरिक जेद्दाह इथून भारतात परतले

* क्रीडा:साउथ एशियन युथ टेबल टेनिस चॅम्पियशशिपसाठी तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड

* अनेक प्रकल्पात अत्यल्प जलसाठा:अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 28.81 तर वान मध्ये 36.07 दलघमी जलसाठा दोन लघु प्रकल्प कोरडे

* सीजीएसटी अधीक्षकाने सीबीआयने सापळा रचन्यासाठी दिलेले 25 लाख रूपये घेऊन केला पोबारा 

* आईची पाण्यासाठी होणारी पायपीट बघुन अवघ्या 14 वर्षांच्या मुलाने चक्क खोदली 18 फुट विहीर  

* म्हाडा कोकण मंडळ सोडत 2023: इच्छुकांचे 49 हजार 174 अर्ज पात्र; आता सोडतीची प्रतीक्षा; आता 4654 (14 भूखंडांसह) घरांसाठी बुधवार, 10 मे रोजी सोडत काढण्यात येणार

* मोठी घोषणा : येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार - आदिवासी विकास मंत्री ; विद्यार्थ्यांची दर 2 महिन्यातून तर शिक्षकांची दर 3 महिन्यातून परीक्षा घेण्यात येणार 

* गोळीबारात 6 जण ठार : मध्य प्रदेशामध्ये मोरोनातील सिहौनियामधील लेपा गावात जमिनीच्या वादातून 2 गटात वाद, एका गटाने तुफान गोळीबार करून एकाच कुटुंबातील 6 जण केले ठार

* 'रावरंभा' चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित: सिनेमाच्या माध्यमातून इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार, येत्या 12 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार

* शेअर बाजार: आज सेन्सेक्स 694 अंकांनी घसरून 61,054.29 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 186 अंकांनी घसरून 18,069.00 अंकांवर बंद

* shopify कंपनी कर्मचारी कपात करणार: ई-कॉमर्स कंपनी shopify च्या 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार, shopifyचे CEO टोबायस लॉटका यांची माहीती

* ईडब्ल्यूएस आरक्षणावर सुनावणी: येत्या 9 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार, आर्थिक दृष्टीने कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी (EWS) 10 टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात दाखल केली होती याचिका

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 57200 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 62400 रुपये 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या