🌟परभणी-वसमत मार्गावरील राहटीनदी पुलावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इसरो) वरिष्ठ शास्त्रज्ञावर प्राण घातक हल्ला...!


🌟तिन दुचाकीवर आलेल्या सहा हल्लेखोरांनी केला लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला🌟


पुर्णा (दि.०९ मे २०२३) : परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विषारी कोब्रा नागा प्रमाणे फनी काढत असल्याचे निदर्शनास येत असून संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांसह राज्य महामार्गांवर फोफावलेली धाबा संस्कृती व त्यातून होणारी देशी/विदेशी दारुची विक्री कारणीभूत तर नाही ना ? असा देखील प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे कारण दुचाकी वाहनांवरून येत गुन्हा घडवून सहज पसार होता येते असा झालेला भ्रम गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहे असाच प्रकार काल सोमवार दि.०८ मे २०२३ रोजी दुपारच्या सुमारास परभणी-वसमत महार्गावरील राहाटी नदीच्या पुलावर घडला असून जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) या भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेत कार्यरत वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेले नवरदेव पंकज प्रकाश कदम हे आपल्या लग्नासाठी परभणीत येत असताना काल सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या वाहनावर तिन दुचाकीवर आलेल्या सहा जनांनी हल्ला चढवला या हल्ल्यात वैज्ञानिक पंकज कदम गंभीर जखमी झाले आहेत. 

या हल्ल्यात गंभीर जखमी पंकज कदम यांच्यावर परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पंकज कदम हे इसरोमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक पदावर कार्यरत आहेत. मुळचे यवतमाळ  जिल्ह्यामधील उमेरखेड तालुक्यातील मुळावा येथे राहणाऱ्या पंकज यांचा विवाह परभणी येथील वसमत रोडवरील शिवराम नगरातील मुंजाजीराव शेंगुळे यांच्या मुली सोबत ठरला होता आज मंगळवार दि.०९ मे २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता वरद गार्डन मंगल कार्यालयात लग्न होणार होते. या लग्नासाठी पंकज कदम हे आपल्या परिवारासह लग्नाच्या एक दावस अगोदर काल सोमवार दि.०८ मे २०२३ रोजी परभणीला येत होते. दुपारच्या सुमारास त्यांचे वाहन राहटी पुलावर आले असता मोटार सायकलवर आलेल्या सहा हल्लेखोरांनी नवरदेव पंकज यांचे वाहन थांबवले व काही लक्षात येण्याच्या आत हल्लेखोरांनी पंकज यांच्यावर जबरदस्त हल्ला करीत त्यांना रॉडने जबर मारहाण केली.यावेळी त्यांना सोडवण्यास येणाऱ्यांनाही हल्लेखोरांनी धमकी दिली. या हल्ल्या नंतर संबंधीत हल्लेखोर दुचाकीवर बसुन पळून गेले. 

या घटनेत जखमी झालेले पंकज कदम यांना उपाचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  चार ते पाच दिवसांपूर्वी शास्त्रज्ञ पंकज प्रकाश कदम यांच्या वर नांदेड येथे रेल्वे स्टेशन जवळ हल्ला झाला होता. त्यानंतर परभणी येथे स्वताःच्या लग्णासाठी येत असताना पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाला. पाठोपाठ झालेल्या या घटनामुळे हल्लेखोरांचे टारगेट वैज्ञानिक पंकज कदम होते. असे लक्षात येत आहे..परभणीचे उपविभागीय अधिकारी यशवंत काळे अधिकारी राजेंद्र शिरतोडे,हल्ल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथाकाने मिळाल्या नंतर तहसिलदार गणेश चव्हाण भेट देवून चौकशी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या