🌟भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीसह प्रदेश कार्य समितीवर परभणी जिल्ह्यातील दिग्गजांची वर्णी....!


🌟प्रदेश कार्य समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी ज्येष्ठ नेते माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह अनेकांची निवड🌟

परभणी (दि.०३ मे २०२३) :- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीसह प्रदेश कार्य समितीवरील विशेष निमंत्रीत सदस्यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बुधवार ०३ मे २०२३ रोजी मुंबईतून घोषणा केली या कार्यकारीणीत प्रथमच परभणी जिल्ह्याला भरभरून न्याय मिळाला आहे.

          प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून प्रमोद वाकोडकर यांचा यादीत समावेश करण्यात आला असून प्रदेश कार्य समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ नेते विठ्ठलराव रबदडे मामा,माजी आमदार मोहन फड,ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मुंढे,संतोषराव मुरकुटे, डॉ.अनिल कांबळे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, राजेश देशपांडे, संजय शेळके,मोहन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या