🌟आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद....!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आश्‍वासन🌟  

परभणी (दि.१० मे २०२३) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेवर राज्य सरकारद्वारे भरीव तरतूद केली जाईल, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


         मुंबईतील सह्याद्री या अतिथीगृहावर मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही पत्रकार सन्मान योजना राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी सुरु केली असून त्यासाठी भरीव तरतूद केली जाईल, या योजनेतील अटी संदर्भातही तातडीने बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या