🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟कोकणाची वाट लावू नका'; बारसू रिफायनरी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आवाहन🌟

* महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज

* महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दाव्यानं खळबळ

* ट्विटर आता प्रकाशकांना प्रत्येक लेखावर शुल्क आकरण्याची परवानगी देणार, एलॉन मस्क यांची घोषणा

* ऑपरेशन 'कावेरी' सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले! भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू

* मेड इन बेल्लारीच्या जीन्स देशातील तरुण वापरणार ---- राहुल गांधी

* वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर,10 कि.मी अंतर जाण्यासाठी 27 मिनिटं लागत असल्याचं या सर्व्हेतून समोर

* कोकणाची वाट लावू नका'; बारसू रिफायनरी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आवाहन                                                                                  

 * माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय*

* बुलडाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर  माजी आमदार राहुल बोंद्रे यांचेच पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व ; माजी आमदार राहुल बोंद्रे नेतृत्वाखाली चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकला 18 पैकी 17 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी  महायुतीला फक्त 1 जागा

* भावना गवळींच्या पॅनलचा मानोरा बाजार समितीत धुव्वा, वाशिममध्ये एका जागेवर विजय, महाविकास आघाडीचा डंका

* कोल्हापूरमध्ये आपलं ठरलंय पॅटर्न रिटर्न्स, बाजार समितीत मविआचा दणदणीत विजय,सतेज पाटलांचं नियोजन सक्सेसफुल

* शिंदे गटाच्या चौथ्या मंत्र्याला धक्का

* भुसे, सावंत व राठोडांनंतर गुलाबराव पाटलांनी सत्ता गमावली जळगावात गुलाबराव पाटलांना मोठा धक्का ; देवकरांनी केला करेक्ट कार्यक्रम; आघाडीने सत्ता हिसकावली 

* वैशालीताईंनी ताकद दाखवली, पहिल्याच निवडणुकीत कडवी लढत, मात्र किशोर पाटील पाचोऱ्यात काठावर पास*

* मुक्ताईनगर बोदवड APMC वर एकनाथ खडसेंची सत्ता, विजयानंतर खडसेंनी धरला DJ वर ठेका*

* तासगांव  बाजार समिती 16/2 रोहित पाटील यांचा जलवा कायम

*उद्दिष्ट: 2026 पर्यंत 7000 मेगावॅट सौर उर्जा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत, महाराष्ट्र सरकार डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान 30% कृषी फीडर सौर उर्जेवर चालवण्यासाठी योजना आखत आहे.*

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दिल्ली युनिटचा शुभारंभ; शहरात विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' राबविण्याची ग्वाही

* भुसावळ तालुक्यातील निमगव्हाण शिवारातील कोरड्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना रविवारी पहाटे घडली.

* पंजाबमधील लुधियाना येथे विषारी वायूची गळती होऊन मोठी दुर्घटना,९ जणांचा मृत्यू, अनेकजण बेशुद्ध

* भूकंपाच्या धक्क्यांनी जम्मू-काश्मीर हादरले, आज पहाजे ५.१५ वाजता रिश्टर स्केलवर ४.१ एवढी नोंदली गेली भूकंपाची तीव्रता

* श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील गुन्हेगार आफताबवरील आरोप निश्चिती ९ मे रोजी होणार  

* भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या