🌟पुर्णेतील शिक्षक कॉलनी येथील ज्येष्ठ महिला बायनाबाई संतुका वाघमारे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन...!


🌟तालुक्यातील सुहागन येथील राजे संभाजी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गौतम वाघमारे यांच्या त्या आई होत्या🌟

पुर्णा (दि.07 मे 2023) - पुर्णा शहरातील शिक्षक कॉलनी येथील ज्येष्ठ महिला बायनाबाई संतुका वाघमारे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने दिनांक 1 मे रोजी रात्री आठ वाजता दुःखद निधन झाले दि.02 मे 2023 रोजी बौद्ध स्मशानभूमी सकाळी 11 वाजता अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये बौद्ध स्मशान भूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या दुःखद निधनाबद्दल भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश यांनी दुःख व्यक्त केले आहे.

यावेळी सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने हजर होते.सुहागन येथील राजे संभाजी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गौतम वाघमारे यांच्या त्या आई होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या