🌟मध्य प्रदेशातील पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये कार्यरत महिला इंजिनिअरच्या घरी सापडलं चक्क 7 कोटींचे मोठे घबाड...!


🌟30 लाखांचा टी.व्ही,50 विदेशी कुत्रे,महिंद्रा थारसह अनेक गाड्या,करोडेचे दागिने🌟

 ✍️मोहन चौकेकर

गुरुवारी लोकायुक्तांच्या पथकाने मध्य प्रदेश पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता हेमा मीना यांच्या घरी आणि फार्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी हेमा मीना यांच्याकडे तब्बल सात कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघडकीस आलं आहे.मीना यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याची तक्रार लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ही छापेमारी करण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार, मीना यांच्याकडे आतापर्यंत सात कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. यामध्ये ३० लाखांचा टीव्ही, दागिने, विविध प्रजातींचे ५० विदेशी कुत्रे, गाई, म्हशी, दोन ट्रक, एक थारसह १० आलिशान वाहने आणि रोकड यांचा समावेश आहे. याबरोबरच मीना यांच्या फार्महाऊसवर एक स्पेशल रुम बनवण्यात आली होती. या रुमध्ये मोठ्या प्रमाणात महागडी दारू आणि सिगारेट, हार्वेस्टर, भात पेरणी यंत्र, ट्रॅक्टर आणि इतर शेती उपकरणंही आढळून आली आहेत.

* हेमा मीना संपर्कासाठी वॉकी टॉकीचा वापर करत :-

हेमा मीना या त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या २० हजार चौरस फुट जागेवरील बंगल्यात राहतात. या बंगल्यात ४० खोल्या आहेत. तसेच शेकडो कामगार आहेत. या आलिशान बंगल्यात एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी त्या वॉकी टॉकीचा वापर करत असत. वॉकी टॉकीवरुनच मीना त्यांच्याशी संवाद साधत असतं.

* हेमा मीना यांना ३० हजार रुपये मासिक वेतन :-

दरम्यान, हेमा मीना यांचे मासिक वेतन ३० हजार रुपये असून त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा २३२ टक्क्यांनी जास्त आहेत, अशी माहिती लोकायुक्त पथकातील डीएसपी संजय शुक्ला यांनी दिली. तसेच हेमा मीना यांना ताब्यात घेण्यात आलं असून यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंही ते म्हणाले.

* फार्म हाऊसवर मिळालेले अनेक परदेशी श्वान :-

माहितीनुसार, लोकायुक्तच्या पथकाला आतापर्यंत इंजिनिअरकडे ७ कोटींची संपत्ती असल्याचे आढळले आहे. त्यात जमीन, वाहने, बंगला, फार्म हाऊस, लाखोंची कृषी उपकरणे, अनेक परदेशी श्वान आणि गाई, फार्म हाऊसवर ६०-७० वेगवेगळ्या ब्रीडच्या गायीदेखील आहेत.

* हेमा मीणा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही वर्षांपूर्वी अशी नव्हती :-

सहाय्यक अभियंता म्हणून कंत्राटावर काम करणाऱ्या हेमा मीणा यांच्याबाबत अनेक चर्चा आहेत. काही वर्षांपूर्वी हेमा मीणा यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अशी नव्हती, असे लोक सांगतात. अचानक काही वर्षात असे काय घडले की करोडोंची मालमत्ता गोळा केली. दुसरीकडे, अभियंता हेमा मीणा सांगतात की, तिच्या वडिलांनी आणि भावाने या मालमत्ता विकत घेऊन मला दान केल्या. लोकायुक्त सर्व अँगलने तपास करत आहेत.

* तीन ठिकाणी छापेमारी :-

डीएसपीने सांगितले की, जेव्हा हेमा मीणाच्या उत्पन्नासह तिच्या मालमत्तेचे विश्लेषण केले गेले तेव्हा तिची मालमत्ता ३३२ टक्के जास्त असल्याचे आढळून आले. सध्या तीन ठिकाणी शोध घेतला जात आहे. आता मिळणाऱ्या गोष्टींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक बोलावण्यात आले असून, ते इमारतीचे मूल्यांकन करणार आहेत. यासोबतच पशुसंवर्धन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. काही बाबींचे विश्लेषण केले जात आहे.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या