🌟परभणी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी 7 मे पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन....!


🌟‘शासकीय योजनांच्या जत्रेचा बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा’🌟

परभणी (दि.०३ मे २०२३) : राज्य शासनाचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, परभणी व एच.एल.एल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ मे या दरम्यान शासकीय योजनांची जत्रा अंतर्गंत ‘योजना जन कल्याणकारी सर्व सामान्यांच्या दारी’  कार्य्रक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह (www.mahabocw.in) संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी वि. नं. माणगावकर यांनी केले आहे. 

राज्य शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी कामगारांनी ही नोंदणी करावी राज्य शासनाच्या ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी नावनोंदणीसाठी संगणकीकृत प्रणालीद्वारे अर्ज करावेत. कामगारांच्या अर्जांची नंतर तपासणी होते. योग्य व परिपूर्ण माहिती भरलेल्या अर्जांच्या तपासणीनंतर या योजनेसाठी पात्र लाभार्थी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात विविध योजनेची रक्कम थेट हस्तांतरित होते. या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, मुलीच्या विवाहासाठी, पत्नीच्या प्रसूतीसाठी व घर बांधणीसाठी विविध लाभ देण्यात येतात, असेही सरकारी कामगार अधिकारी श्री.माणगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या