🌟‘शासकीय योजनांची जत्रा’ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पंचायत आणि नरेगा सेवेचा 45 हजार लाभार्थ्यांना लाभ.....!


🌟अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी दिली 🌟

परभणी (दि.०२ मे २०२३) :  राज्य शासनाने ‘शासकीय योजनांची जत्रा’ ही महत्वाकांक्षी मोहीम 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम पंचायत विभाग व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना विभागास या मोहिमेअंतर्गत किमान 45 हजार नागरिकांना सेवा देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ‘शासकीय योजनांची जत्रा’ या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत विभाग व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्या पुढीलप्रमाणे सेवानिहाय किमान उद्दीष्ट देण्यात येणार आहे. 

सेवेचे प्रकार आणि देण्यात आलेले किमान उद्दिष्ट पुढील प्रमाणे - विविध दाखले (ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे 07 दाखले) जन्माचा दाखला, मृत्युचा दाखला, न.नं. 8 चा दाखला, विवाह नोंदीचा दाखला, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, बेबाकी प्रमाणपत्र, निराधार असल्याचा दाखला – उद्दिष्ट 12 हजार, ऊसतोड कामगार ओळखपत्र – 5 हजार, नविन जॉबकार्ड देणे अथवा अद्यावत करणे – 5 हजार, आयुष्यमान भारत नोंदणी – 5 हजार, नरेगा अंतर्गत विविध योजना (जलसिंचन विहीर, शेततळे, शोषखड्डे इ.) – 2 हजार, ईश्रम कार्ड वितरण – 5 हजार, दिव्यांग लाभार्थी निधी वितरण – 1 हजार आणि सिटीझन कनेक्ट अॅप नोंदणी 10 हजार असे एकूण 45 हजार आहे.

वरिल 8 सेवांबाबत 45 हजार उद्दीष्ट ठरविले असून परभणी जिल्ह्यातील 09 पंचायत समितींना एकुण 45 हजार सेवा देण्याचे उद्दीष्ट खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. यामध्ये जिंतूर तालूक्यासाठी 9 हजार तर परभणीसाठी 7 हजार, गंगाखेड 7 हजार,  सेलू 5 हजार, पुर्णा 5 हजार, पालम 3 हजार, पाथरी 3 हजार,  सोनपेठ 3 हजार, मानवत 3 हजार असे एकूण 45 हजार विविध सेवांचा लाभा ‘शासकीय योजनेची जत्रा’ या मोहिमेअंतर्गत नागरीकांना देण्यात येणार आहे. नागरिकांना या मोहिमेंचा लाभ घेता यावा यासाठी संबंधीत यंत्रणेनी गावा-गावात प्रचार प्रसिध्दी व दवंडी द्यावी. तसेच या मोहिमेअंतर्गत लोकप्रतिनीधींना या मोहिमेत सामील करुन घेत तालुक्यातील योग्य ठिकाणी लाभार्थी मेळावे आयोजीत करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा परिषदेला वेळेत सादर करावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या