🌟गुरु हरगोविंद साहेबजी यांच्या जयंतीनिमित्त सिमरन-भव्य नगरकीर्तनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन...!


🌟कार्यक्रमाचा समारोप नगरकिर्तनाने होणार असल्याची माहिती हजुरी क्रांती संघटनेचे प्रमुख मनप्रीतसिंघ कुंजीवालेंनी दिली🌟 

नांदेड /प्रतिनिधी (दि.२७ मे २०२३) - सिख धर्मीयांचे सहावे धर्मगुरू श्री हरगोविंद साहेबजी महाराज यांच्या 428 व्या जयंतीनिमित्त दि. 30 मे ते 5 जून पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समारोप नगरकीर्तनाने होणार असल्याची माहिती हजुरी साथ संगत व हजुरी क्रांती संघटनेचे प्रमुख मनप्रीतसिंघ कुंजीवाले यांनी दिली आहे.

      गुरुद्वारा मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघ,पंचप्यारे साहेब यांच्या आशीर्वादाने बाबा नरेंद्रसिंघजी बाबा बलविंदरसिंघजी लंगर साहेब, माता साहेब देवांजी जत्थेदार बाबा तेजासिंघजी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु हरगोविंद साहेबजी महाराज यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . सहावे गुरु श्रीहरगोविंद साहेबजी महाराज यांची जयंती दि. 5 जून रोजी साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने साहेब जादा फत्तेसिंगजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे सात दिवस दररोज कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

      यामध्ये दुपारी 3.30 ते 5 वा. च्या दरम्यान सुखमणी साहेब पाठ व सायं 8 ते 9 वा. दरम्यान श्री हरगोविंद साहेबजी महाराज यांची जीवनकथा कथाकार ज्ञानीभाई सरबजीतसिंघजी व ज्ञानीभाई नाहरसिंगजी सादर करण्यात आहेत. दररोज सायं  सव्वा 9.15 ते 10 वा. दरम्यान गुरु का लंगर प्रसाद आयोजन केले आहे. दि. 5 जून रोजी सर्व कथापाठ समाप्तीनंतर कार्यक्रम स्थळापासून नगरकीर्तन करण्यात येणार असून यादरम्यान 31 मे रोजी आर्चरी व दि. 1 ते 2 जून रोजी मार्शल आर्ट स्पर्धा होणार आहेत.  कार्यक्रमांना सर्व साथ संगतने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम व भव्य लंगर/प्रसादाचा लाभ घेऊन महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करावेत असे आवाहन समुह हजुरी साथ संगत व हजुरी क्रांती संघटनेच्यावतीने केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या