🌟नांदेड गुरुद्वारा सचखंड बोर्ड संघटनाही परभणी जिल्ह्यातील उखळद घटनेवर संतप्त....!


🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत तिन नाबालिक सिख सिकलकरी मुलांवर अमानुष अत्याचार एकाची हत्या🌟


🌟घटनेच्या निषेधार्थ नांदेड गुरुद्वारा सचखंड बोर्ड संघटनाचे पोलिस अधीक्षकांना निवेदन : दोषींना कठोर शिक्षेची केली मागणी🌟 


नांदेड (दि.३० मे २०२३) - नांदेड गुरुद्वारा सचखंड बोर्ड येथील सिख संघटनांच्या वतीने दि.२७ मे २०२३ रोजी परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद येथे संघटीत टोळक्याने निरपराध नाबालिक चौदा ते १६ वयोगटातील तिन सिख सिकलकरी मुलांवर डोळ्यात मिरचीची पुड टाकून डोरखंडाने हातपाय बांधून त्यांच्या डोक्यावरील दस्तार सोडून केस धरून लोखंडी रॉड व काठ्या लाठ्यांनी गंभीर स्वरुपाची मारहाण केली होती या हृदयविदारक घटनेत १४ वर्षीय किरपानसिंघ भोंद या बालकाचा जागीवरच मृत्यू तर गोरासिंघ टाक,अरुणसिंघ टाक हे दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे पोलिस पथकाने त्यांना परभणी जिल्हा शासकीय सामान्य रुग्नालयात उपचारासाठी भरती केले होते या घटनेचा गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड या सिख संघटनेच्या वतीने तिव्र स्वरुपात निषेध करीत या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की  परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौ.उखळद येथे दि.२७ मे २०२३ रोजी उखळद-नवागड रस्त्यावरून जाणाऱ्या क्रिपानसिंग भोंड,गोरासिंग टाक,अरुणसिंग टाक यांना चोर समजून लोखंडी रॉडणे,डोळ्यात मिरची टाकून हात पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली,यामध्ये क्रिपानसिंग भोंड यांचा मृत्यू झाला असून दोन जण जबर जखमी झाले आहेत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सिख संघटनाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अवतार सिंग पहरेदार,रविंद्रसिंग कपूर,बलबीर सिंग,तेगासिंग बावरी जसपाल सिंग,जहाँगीर सिंग बावरी,हरमोहन सिंग टाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या