🌟पुन्हा एकदा सरकारची नोटबंदी, 2000 हजारांची नोट लवकरच चलनातून बंद होणार...!


🌟30 सप्टेंबर पर्यंत 2000 हजारांच्या नोटा बॅकांमधुन बदलून घेण्याचे नागरिकांना आवाहन🌟

 ✍️मोहन चौकेकर

आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे . आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील. जाणुन घ्या या बद्दलची हि महत्वाची अपडेट पूर्ण नक्की वाचा . काय आहे कारण ?

येत्या काही महिनाभरात 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार हे नाकारता येणार नाही.  RBI ने घेतलेल्या ताज्या निर्णयाचा अर्थ असा आहे की या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत आणि 30 सप्टेंबर 2023 नंतर या नोटा देखील बँकेच्या चलनातून काढून टाकल्या जातील. नोट बंद होणार की नाही, याचे उत्तर मिळायला वेळ लागेल, पण या निर्णयाचा अर्थ निश्चितपणे ही नोट बंद करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.

*२३ मे पासून 2000 च्या  नोटा बॅकामध्ये बदलता येतील :-

                                                                                  २३ मे २०२३ पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता. परंतु एका वेळी केवळ २० हजार रुपयांच्या नोटाच अर्थात १० नोटाच तुम्हाला बदलता येतील. २०१८-२०१९ मध्येच २ हजारांच्या नोटेची प्रिटिंग थांबविण्यात आली. २०००  रुपयांची नोट RBI कायदा १९३४ च्या कलम २४ (१) अंतर्गत आणण्यात आली होती . जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. दुसऱ्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे २०१८-२०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

* मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही :-

*२०१६ – १७  या आर्थिक वर्षात २०००  रुपयांच्या ३५४२९.९१  कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर २०१७-१८  मध्ये अत्यंत कमी १११५.०७ कोटी नोटा छापण्यात आल्या, आणि त्यात आणखी कपात करुन २०१८-१९  मध्ये केवळ  ४६६.९०  कोटी नोटा छापण्यात आल्या.२०१९-२०, २०२०-२१  आणि २०२१-२२  या तीन आर्थिक वर्षांमध्ये २०००  रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

* २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली :-

दरम्यान, संसदेत १  ऑगस्ट २०२२  रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार,२०१६  ते२०२० दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या २०००  रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २,२७२  वरुन २,४४,८३४  वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार २०१६ मध्ये देशात २०००  रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २,२७२ होती.

* आरबीआयचा अहवाल :-

RBI च्या वार्षिक अहवालानुसार, 31 मार्च 2022 रोजीच्या आकडेवारीवरुन, 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात होत्या. एकूण चलनाचा हा आकडा 1.6% आहे. त्यांचे मूल्य 4,28,394 कोटी रुपये आहे. हिच रक्कम 2023 मध्ये 3.62  लाख कोटी इतकी झाली आहे. जी केवळ 10.8 इतकी होती.एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून का गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे.

* नकली नोटा :-

दरम्यान ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या. तर 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या.

2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या. तर पुढील वर्षी तर नकली नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या. लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैर वापर करत आहे. त्यासाठी तर त्या दडवून ठेवण्यात येत नाही ना, असा एक मतप्रवाह आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या