🌟दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाची घोषणा : काचीगुडा-बिकानेर दरम्यान विशेष रेल्वेच्या 16 फेर्‍या चालविल्या जाणार...!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिलीे🌟

परभणी (दि.05 मे 2023) : काचीगुडा ते बिकानेर दरम्यान विशेष गाडीच्या 16 फेर्‍या चालविल्या जाणार आहेत अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिलीे.

         गाडी क्रमांक 07053 काचीगुडा ते बिकानेर  हि विशेष गाडी काचीगुडा येथून 6 मे ते 24 जून दरम्यान दर शनिवारी रात्री 9.30 वाजता सुटेल आणि मेडचल, वाडियाराम, कामरेड्डी, निजामाबाद, बासर  मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नंदुरबार, सुरत, वडोदरा, गेरतपूर, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड, पाली मारवाड, लुनी, जोधपूर, गोतान, मेरता रोड, नागौर आणि नोखा मार्गे बिकानेर येथे सोमवारी दुपारी 1.50 वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक 07054 बिकानेर - काचिगुडा हि विशेष गाडी बिकानेर येथून दिनांक 9 मे ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी रात्री 8.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गाने काचीगुडा येथे गुरुवारी सकाळी 9.40 वाजता पोहोचेल. दरम्यान, या गाड्यांमध्ये फर्स्ट एसी, 2 एसी, 3 एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास कोच या डब्ब्यांचा समावेश असणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या