🌟शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत 10 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन....!


🌟या मेळाव्यामध्ये विविध नामांकित उद्योजक, कंपन्या सहभाग नोंदविणार🌟

परभणी (दि.02 मे 2023) :  महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या विद्यमानाने " शासकीय योजनांची जत्रा " या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार उमेदवरांना राज्यातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन देणेसाठी "पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दि. 10 मे, 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विविध नामांकित उद्योजक, कंपन्या सहभाग नोंदविणार असुन जास्तीत जास्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दि. 04 मे 2023 पासून www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर job Seeker म्हणून आपले नांव नोंदविण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे. तसेच नोंदणी अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452 220074 वर संपर्क साधावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या